Goa Accident : ब्रम्हाकरमळीतील अरुंद रस्त्यामुळे कारचा अपघात; अल्पवयीन मुलगी जखमी

रस्ता कच्चा, अरुंद असल्याने वारंवार अपघात सुरुच
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रह्मा-करमळी सत्तरी गावातील पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे तयार करण्यात आलेल्या नगरगाव हेदोडे लईराई मंदिराकडून ब्रम्हा करमळी गावात जाणाऱ्या रस्त्यावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

रस्ता कच्चा आणि अरुंद असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचे समजते. संबंधितानी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी या कच्चा व अरुंद रस्त्यावर चार चाकी वाहनाचा अपघात होऊन कार खड्ड्यात पडून अपघात झाला.

यात एका अल्पवयीन मुलीला अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. तसेच वाहनांचे ही अपघातामुळे नुकसान झाले आहे. सुदेवाने जिवीत हानी झाली आहे. हा रस्ता कच्चा असल्याने वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही.

Goa Accident
Health Review Meeting : वाढती कोरोना रुग्णसंख्या, G-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आढावा

याबाबत अधिक माहिती अशी की, नगरगाव पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या महत्वाच्या अरुंद पालाच्या नवीन बांधकामाचा शुभारंभ दोन दिवसापुर्वीच झाला आहे. सदर पुल हा ब्रह्मकरमळी, शेळप, नानेली, शिंगणे या भागात जाण्यासाठी याचा वापर केला जातो. आता या पुलाचे बांधकाम होणार असल्याने शिंगणे व नानेली, शेळप व ब्रह्माकरमळी या गावांसाठी जाण्यासाठी सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

Goa Accident
Job Fair In Goa: गोमन्तकीय तरूणांनो जॉब शोधताय? लागा तयारीला! फ्रेशर, अनुभवी उमेदवारांसाठी सरकारी जॉब फेअर, वाचा सविस्तर

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती सदर मार्गावरील वाहतूक व्यवस्था नगरगाव हेदोडे लईराई मंदिरापासून वाळवंट ब्रह्माकरमळी या मार्गे वळविण्यात आली आहे. तरी नानेली, ब्रह्माकरमळी, शेळप, शिंगणे या ठिकाणी जाणाऱ्या लोकांनी व ब्रह्मदेव देवस्थान ब्रह्माकरमळी येथे येणाऱ्या पर्यटकांनी नगरगाव लईराई मंदिर ते वाळवंटी या बगल मार्गाचा उपयोग करून ब्रह्मा करमळी गाठावी लागत आहे.

आपले दैनंदिन व्यवहार करावे लागत आहे. त्यामुळे वाहन हाकताना वाहन चालकांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तसेच बगल रस्त्याचा वापर करताना काळजीपुर्वक केली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com