Quepem Drowning: लग्नाच्या धांदलीत दुर्लक्ष, अन् लेकीने गमावले प्राण; केपे येथे आणखीन एका चिमुकलीचा बुडून मृत्यू

Girl Accidental death Quepem: ही मुलगी तिच्या नातेवाईकांच्या घरी एका विवाह सोहळ्यासाठी आली होती. लहानग्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
Goa child drowning
Goa child drowningDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: केपे येथील शिरवाई या गावात रविवारी (दि. ०४) रोजी संध्याकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास एका आठ वर्षीय मुलीचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही मुलगी तिच्या नातेवाईकांच्या घरी एका विवाह सोहळ्यासाठी आली होती. लहानग्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेडामळ-शिरवई येथील ही लहानगी मुलगी रविवारी संध्याकाळी खेळत असताना अचानक नातेवाईकांच्या घराशेजारी असलेल्या कालव्यात पडली. कुटुंबीयांनी तात्काळ तिचा शोध सुरू केला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे अडीच तासांच्या शोधकार्यानंतर तिचा मृतदेह केपे येथील पॉप जॉन शाळेजवळच्या कालव्यात सापडला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय, मडगाव येथे पाठवण्यात आला असून या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Goa child drowning
Baga Beach: खेळता खेळता खोल समुद्रात गेली, नंतर दिसेनाशी झाली; बागा किनाऱ्यावर बुडालेल्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत केपे तालुक्यात कालव्यात बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, शिवनगर-शेल्डे येथे दोन व्यक्तींचा कालव्यात बुडून मृत्यू झाला होता आणि आता या लहानग्या मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घाईगडबडीत मुलीकडे दुर्लक्ष

मयत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार घरात लग्नकार्याची गडबड सुरु होती. या गडबडीत मुलगी तिच्या आईला जवळच असलेल्या नदीच्या कालव्याजवळ जाण्याची विनवणी करत होती मात्र सुरु असलेल्या गडबडीमुळे तिच्या आईने त्याकडे लक्ष दिलं नाही. यानंतर मुलगी कधी किनाऱ्यावर निघून गेली कोणालाही समजलं नाही. संध्याकाळी कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी आईने शोधाशोध सुरु केली असता ती मुलगी कालव्यात मृतअवस्थेत आढळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com