

मडगाव: केळशी मोबोर मार्गावर प्रवाशांसाठी वाहतूक करणारे काही खासगी बसचालक मनमानी करत असून प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताना सरपंच वाझ यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा गैरप्रकारांना गावकरी आणि स्थानिक प्रशासन मुळीच सहन करणार नाही. पोलिसांनी त्वरित योग्य ती कारवाई करावी, अन्यथा गावकरी व स्थानिक लोक बस अडवून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
केळशी मोबोर मार्गावर सध्या कदंब बससेवा कार्यरत आहे. मात्र कदंब बसच्या वेळेच्या आधीच काही खासगी बसवाल्यांकडून आपापल्या बसेस रस्त्यावर उतरवून प्रवाशांना अडवले जाते. या गोंधळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
हल्लीच घडलेल्या एका घटनेत, एका महिलेसह दोन मतिमंद मुलांवर खासगी बसचालकांनी अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे स्थानिकांत संतापाचे वातावरण आहे. सरपंच वाझ यांच्या या तक्रारीमुळे पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून समजते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.