
Goa introduces QR code system to streamline tourist vehicle
पणजी: गोवा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. राज्यात पर्यटकांची सोय व्हावी म्हणून गोवा सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. गोव्यात पर्यटकांसाठी आता क्यूआर कोड आधारित प्रणाली लागू करण्यात येणार आहे आणि वाहनांसह प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी क्यूआर कोड आधारित प्रणाली लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे राज्यात वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.
पर्यटकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासली गेली, की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक क्यूआर कोड तयार केला जातो आणि तो एसएमएसद्वारे पाठवला जातो. हा कोड १२ तासांसाठी वैध असल्यामुळे, प्रवाशांना पुन्हा पुन्हा कागदपत्रे तपासण्याची गरज पडता नाही आणि राज्यात कुठेही फिरता येतं. क्यूआर कोड तयार झाल्यानंतर वाहतूक अधिकाऱ्यांनी पुन्हा थांबवल्यास, पर्यटक क्यूआर कोड दाखवू शकतात. हा क्युअर कोड स्कॅन केल्यानंतर अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासली गळ्याची खात्री पटते.
गोवा पोलिसांनी आतापर्यंत ४,००० पर्यटकांसाठी क्यूआर कोड जारी केले आहेत, ज्यामुळे वारंवार कागदपत्रे तपासण्याचा त्रास कमी झाला आहे. हा उपक्रम गोवा पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन वाढवण्यासाठी आणि वाहनचालकांसाठी अडथळे कमी करण्यासाठी विकसित केलेल्या 'क्विक पास' मोबाइल ॲप्लिकेशनचा भाग आहे.
या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना गुन्हे शाखेचे एसपी राहुल गुप्ता यांनी सांगितले, "गोवा पोलिसांनी वाहतूक अधिकाऱ्यांसाठी 'क्विक पास' मोबाइल ॲप्लिकेशन तयार केले आहे, जे वाहतूक नियमांचे पालन सुलभ करण्यासाठी आणि वाहनचालकांसाठी गैरसोय कमी करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. या उपक्रमामुळे, कागदपत्रे तपासणी सुलभ झाली आहे आणि यामुळे वाहतूक नियमांचे पालन करत वाहन चलनाची सुलभता देखील वाढली आहे.
याशिवाय, ॲपमध्ये जिओटॅगिंग, वाहतूक तपासणी हॉटस्पॉट मॅपिंग आणि रिअल-टाइम वाहतूक डेटा विश्लेषण यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. ही साधने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहतूक व्यवस्थापनाचा आरखडा तयार करण्यास मदत करती, ज्यामुळे रस्ते सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. "देशातील कोणत्याही राज्याने विकसित केलेले हे पहिले ॲप आहे. यामुळे गोव्यातील पर्यटकांचा अनुभव सुधारण्यास मदत होईल," असे गुप्ता म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.