
Pusapati Ashok Gajapathi Raju
पणजी: गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या पी. अशोक गजपति राजू यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाला सन्मानपूर्वक विराम देत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
१९७८ मध्ये वडील व भावाच्या निधनानंतर सिम्हाचलम मंदिराचे वारसा हक्काचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यातूनच त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली होती. राज्यपालपद हे घटनात्मक पद असल्याने कोणत्याही पक्षाशी जवळचा संबंध ठेवता येत नाही, हे अधोरेखित करत त्यांनी तेलगू देसम् पक्षाचे प्राथमिक आणि पोलिट ब्युरो सदस्यत्वही सोडले.
त्यांनी आपला राजीनामा मंदिरातील ध्वजस्तंभाजवळ सही करून पाठवला आणि पक्षाध्यक्ष चंद्राबाबू नायडू तसेच प्रदेशाध्यक्ष पल्ला श्रीनिवास राव यांच्याकडे सुपूर्द केला. सिम्हाचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिरात त्यांनी कुटुंबासह दर्शन घेतले. पूर्णकुंभ स्वागत, नादस्वर, वेदघोष यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कप्पा स्तंभाला आलिंगन दिले आणि बेडा मंडपात जाऊन मंगल आरती घेतली.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्रातील नेत्यांचे आभार मानले. तेलगू जनतेचा अभिमान जपण्याचे जीवनभराचे व्रत त्यांनी पुन्हा व्यक्त केले. गोमंतकीयांनाही नव्या राज्यपालाची आगमनाची उत्सुकता लागली आहे.
समर्थकांची भेटीसाठी झुंबड
पी. अशोक गजपति राजू यांच्या निवासस्थानी मंत्रिगण, आमदार, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने भेटीसाठी येत असून अभिनंदनांचे सत्र सुरूच आहे. गोव्यात त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून लवकरच ते आपला पदभार स्वीकारण्यासाठी गोवा गाठणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.