Goa Assembly Monsoon Session: सोमवारपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन! एकवटलेले सत्ताधारी, विस्कटलेले विरोधक; कोणते मुद्दे गाजणार?

Goa Assembly Monsoon Session 2025: आरजीचे आमदार वीरेश बोरकर एकला चलो रेची भूमिका घेतली असून, विजय सरदेसाईंनी बैठक उशीरा घेतल्याचे कारण देत बैठकीकडे पाठ फिरवली.
Goa Assembly Monsoon Session 2025 | Important Points
Goa Assembly Monsoon Session 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

बातमीसंबधी थोडक्यात (What Is This News About)

१) गोवा विधानसभेचे १५ दिवसीय पावसाळी अधिवेशन २१ जुलै २०२५ पासून सुरु होणार आहे.

२) या अधिवेशनात विरोधी पक्षातील आमदारांची एकी नसल्याची विरोधकांसाठी तो मुद्दा अडचणीचा ठरणार आहे.

३) गेल्या चार महिन्यातील गुन्हे, अपघात, भ्रष्टाचाराचे आरोप यासारखे मुद्दे सभागृहात चर्चेचा विषय असतील.

पणजी: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (२१ जुलै) सुरु होणार आहे. अधिवशनापूर्वी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांची रणनिती ठरवणाऱ्या बैठका पार पडल्या आहेत. विरोधकांचे सर्व डावपेच हाणून पाडण्यासाठी सत्ताधारी सज्ज झाले असताना विरोधक मात्र विखुरले असल्याचे पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होणाऱ्या १५ दिवसीय पावसाळी अधिवेशनात आरोप - प्रत्यारोप, विविध विधेयकं आणि प्रस्तावावर चर्चा होताना दिसेल.

भाजपने काही दिवसांपूर्वी अधिवेशनापूर्वी रणनिती ठरविण्यासाठी सर्व आमदार आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक घेतली. यावेळी अपक्ष आमदारांनी देखील हजेरी लावली होती. मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत आमदार आणि मंत्र्यांना पक्षातील आमदार, मंत्र्यांवर प्रत्यक्ष आरोप न करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या. पक्षशिस्त पाळण्याची समज देत दोषाआरोप न करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

Goa Assembly Monsoon Session 2025 | Important Points
Odisha Shocker: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून जाळलं; विद्यार्थिनीच्या आत्मदहनाच्या घटनेनंतर दुसऱ्यांदा हादरले बालासोर

मगो वगळता अपक्ष आमदारांनी देखील या बैठकीला हजेरी लावली होती. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडण्याची रणनिती या बैठकीत ठरविण्यात आली.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षातील आमदारांच्या बैठकीला केवळ काँग्रेस आपचे आमदारांनी हजेरी लावली. तर, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या आमदारांनी दांडी मारली. आरजीचे आमदार वीरेश बोरकर एकला चलो रेची भूमिका घेतली असून, विजय सरदेसाईंनी बैठक उशीरा घेतल्याचे कारण देत बैठकीकडे पाठ फिरवली.

एकीकडे सत्तेतील सर्वजण एकवटले असताना विरोधकांमध्ये मात्र एक्कीचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच, आपने राष्ट्रीय स्तरावर अधिकृतपणे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने सभागृहात विरोधकांचे वेगवेगळे गट दिसण्याची शक्यता आहे. यामुळे विरोधकांचा एकत्रित आवाज तोडका पडण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Monsoon Session 2025 | Important Points
दोन मुलांच्या रशियन आईवर इस्त्रायली उद्योगपतीला गोव्यात झाले प्रेम; 2 मुलींचा जन्म, धोका आणि गुहेत वास्तव्य; पतीने सांगितली 8 वर्षांची कहाणी

अधिवेशनात 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशन अनेक अर्थाने गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात माजी मंंत्री गोविंद गावडे आणि पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत केलेल्या कृतीवरुन देखील विरोधक रान उठवताना दिसतील. याशिवाय कला अकादमीच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम हा मुद्दा प्रकर्षणाने मांडला जाईल.

राज्यात वाढलेली अमली पदार्थांची तस्करी, स्मार्ट सिटी पणजीत सापडणारी गांजाची रोपे, खून, अपघात यासह वाढलेली गुन्हेगारी घटनांची संख्या हे विषय विरोधकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

या अधिवेशनात लईराई देवीच्या यात्रेत झालेली चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन विरोधक सरकारला बोचरे प्रश्न विचारु शकतात. तसेच, याच्या अहवालातील संभ्रमावरुन सवाल उपस्थित केला जाऊ शकतो. विद्यापीठ पेपरफुटीचे प्रकरण, घटते पर्यटन, टॅक्सी एग्रीगेटचा मुद्दा, वाहतूक हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

सातत्याने विचारले जाणारे प्रश्न FAQ | Q/A

प्रश्न: गोवा विधानसभेत किती आमदार आहेत?

उत्तर: गोवा विधानसभेत ४० आमदार आहेत.

प्रश्न: गोव्यात कोणाची सत्ता आहे, मुख्यमंत्री कोण आहे?

उत्तर: गोव्यात भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता असून, डॉ. प्रमोद सावंत राज्याचे मुख्यमंत्री आहेत

प्रश्न: गोवा विधानसभेची निवडणूक कधी आहे? याआधी कधी झाली होती निवडणूक?

उत्तर: गोवा विधानसभेची निवडणूक २०२७ मध्ये होईल. २०२२ मध्ये यापूर्वी निवडणूक झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com