Goa Crime: भरदिवसा गोळ्या घालून केला निर्घृण खून! लपण्यासाठी आले गोव्यात; पंजाबमधील हत्या प्रकरणात 5 जणांच्या मुसक्या आवळल्या

Punjab Murder Case Goa: पंजाबमधील एका हायप्रोफाईल खून खटल्यातील संशयितांनीही लपण्यासाठी गोव्याची निवड केल्याचे उघड झाले आहे. पंजाब पोलिसांनी गोव्यात येऊन पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
Punjab Murder Case Goa
Punjab Murder Case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंजाबमधील एका हायप्रोफाईल खून खटल्यातील संशयितांनीही लपण्यासाठी गोव्याची निवड केल्याचे उघड झाले आहे. पंजाब पोलिसांनी गोव्यात येऊन पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

मोगा (पंजाब) येथील नेस्ले कारखान्याचा कामगार अध्यक्ष उमरसिर सिंग याच्या भरदिवसा झालेल्या हत्येनंतर सुमारे तीन महिन्यांनी तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. गुन्ह्यातील संशयितांनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी गोव्याची निवड केली होती. मात्र, पंजाब पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून ते गोव्यात लपल्याचे शोधून काढले आणि त्यांना पकडले.

Punjab Murder Case Goa
Birch Nightclub Fire: आरोपपत्राला 24 तास होण्याआधीच रेडकर, बागकर यांना सशर्त जामीन; 'ईडी'मार्फत चौकशी शक्य

पंजाबमधील भिंदर कलां गावात ३ जानेवारी रोजी उमरसिर सिंग याच्यावर कारमध्ये असताना सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत टप्प्याटप्प्याने अटक मोहीम राबवली.

Punjab Murder Case Goa
'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

सुरवातीला बलकार सिंग, त्यानंतर करमजीत सिंग ऊर्फ करण आणि ओंकार सिंग यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता गोव्यातून परगत सिंग, गुरमीत कौर, जुगराज सिंग, जसप्रीत सिंग आणि गुरनील कौर या पाचजणांना न अटक करण्यात आली. त्यांना ट्रान्झिट रिमांडवर पंजाबला नेऊन दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ८ संशयितांना अटक झाली असून, आणखी ९ संशयितांचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com