आमदार कुणावर उपकार करत नाही तर तो आपले कर्त्यव्य करतो; दयानंद सोपटे

इन्टरनेट अभावी विधार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होवू नये म्हणून हि सेवा कार्यरत केली जाते असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केले
दयानंद सोपटे
दयानंद सोपटेDainik Gomantak

मोरजी: इन्टरनेट (Internet) सेवा हा आता एक अभ्यासाचा मुख्य घटक बनला आहे, ती सेवा नसेल तर सर्व प्रकारचे व्यवहार थांबतात, शिक्षणावर (Education) त्याचा विपरीत परिणाम होतो, ऑनलाईन अभासक्रम सुरु झाल्याने ज्यांना इन्टरनेट सेवा मिळत नाही, त्यांची गैरसोय होते, हि गैरसोय दूर करण्यासाठी तुमचा आमदार कार्यरत आहे. आमदार कुणावर उपकार करत नाही तर तो आपले कर्त्यव्य करतो, इन्टरनेट अभावी विधार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होवू नये म्हणून हि सेवा कार्यरत केली जाते असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे पंचायत क्षेत्रातील विधार्थ्याना मोफत व्हायफाय इन्टरनेट सेवा मांद्रे दीनदयाल सभागृहात कार्यरत करताना केले. (Goa MLA does no favors to anyone does his duty: Dayanand Sopte)

यावेळी मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर, माजी सरपंच तथा पंच संजय बर्डे, माजी उपसरपंच तथा पंच डेनिस ब्रिटो, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, रोटरी क्लबचे उमेश नाईक, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत आदी उपस्थित होते.

दयानंद सोपटे
Goa Political show: काँग्रेसला सद्‍बुध्दी लाभो; मुख्यमंत्र्यांच्या गावात नियम 12 च्या भावात

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना मोफत इन्टरनेट सेवेचा विधार्थ्यानी केवळ शिक्षणासाठी वापर करावा, गैरवापर टाळावा असे आवाहन करून, कोरोना काळात शिक्षणक्षेत्रातील सर्व विध्यालये बंद राहिली, विधार्थ्याना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले . परतू ग्रामीण भागात इन्टरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने त्याचे परिणाम विध्यार्थ्यावर होत आहे याची जाण ठेवून तृम्ही निवडून दिलेल्या आमदाराला तुमची काळजी असल्याने हि सेवा कार्यरत केली आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे यांनी कोरोना काळात भरीव कार्य केले अनेकाना मदत केली, आता ते स्वतः विधार्थ्यांसाठी मोफत व्हायफाय सेवा कार्यरत केली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

दयानंद सोपटे
Goa Rape Case: रघुपती राघव राजाराम, प्रमोदाक सद्‍बुध्दी दे भगवान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com