अरविंद केजरीवाल यांची आज कांपाल येथे जाहीरसभा

अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.
Arvind Kejriwal 

Arvind Kejriwal 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मंगळवारी पणजीत निवडणुकीपूर्वी पक्षाच्या पहिल्या जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. ते दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.

<div class="paragraphs"><p>Arvind Kejriwal&nbsp;</p></div>
मी काँग्रेसमध्ये जाणार अशी अफवा पसरवली जात आहे: मायकल लोबो

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सर्वप्रथम मंगळवारी ४ वा. भाऊसाहेब बांदोडकर मैदान, कांपाल येथे महासभेला संबोधित करतील. आपच्या गोवा (Goa) प्रभारी आतिशी मार्लेना या गोव्यात दाखल झाल्या असून त्यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे.

आतिशी यांनी पणजीमध्ये जाहीर सभा घेण्यास सरकारने जाणीवपूर्वक विलंब केल्याबद्दल राज्य सरकारवर तोफ डागली होती. ट्रिटद्वारे मार्लेना यांनी रॅलीची परवानगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अजूनही दिली नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांना परवानगी दिल्याचे आपच्या (AAP) नेत्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Arvind Kejriwal&nbsp;</p></div>
नोकरभरती संदर्भात काँग्रेसचा मुख्यमंत्री निवासावर ढोल ताशांच्या गजरात मोर्चा

"राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर पैसे घेऊन पक्षांतर करणे सुरू आहे. यामध्ये केवळ एकच आप पक्ष खंबीरपणे लढत आहे आणि तोच पक्ष आज गोव्याला हवा आहे", असे गोवा प्रभारी आतिशी मार्लेना म्हणाल्या.

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परंतु एकही राजकीय पक्ष किंवा राजकारणी गोव्याच्या विकासावर भाष्य करत नाही. प्रत्येकजण युतीचीच भाषणे करतात, तसेच पक्षांतर करण्यावर अधिक भर देतात. यावरून कुठल्याच पक्षाला गोमंतकीयांसाठी काम करायचे नसल्याचे सिद्ध होते आणि याची दखल यावेळी जनता घेईल, असा विश्वास आतिशी मार्लेना यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com