मी काँग्रेसमध्ये जाणार अशी अफवा पसरवली जात आहे: मायकल लोबो

आम्ही कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची, ते आमचे मतदार ठरवणार आहेत, असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.
Michael Lobo

Michael Lobo

Dainik Gomantak 

Published on
Updated on

कळंगुट: राजकारणात अफवा पसरविणे सोपे असते, कोणीही काहीही म्हणत असले, तरीसुद्धा आमच्याबाबतच्या अफवांतून तथ्य नाही. जनतेने अफवावर विश्‍वास ठेवू नये. आम्ही कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची, ते आमचे मतदार ठरवणार आहेत. पाच वर्षे झोपेचे सोंग घेतलेले विरोधक टीका करत आहेत, अशांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे मत मंत्री मायकल लोबो यांनी साळगाव येथे व्यक्त केले.

<div class="paragraphs"><p>Michael Lobo</p></div>
नोकरभरती संदर्भात काँग्रेसचा मुख्यमंत्री निवासावर ढोल ताशांच्या गजरात मोर्चा

बार्देश, पेडणे, डिचोली तालुक्यातील कचऱ्यावर साळगाव कचरा प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येते. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात आली आहे. या विस्तारीत प्रकल्पाचे उद्‍घाटन लोबो यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर गोवा (Goa) कचरा व्यवस्थापनाचे संचालक लेविंन्सन मार्टीन्स, गोवा राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे हरीष हडकोणकार, नाबार्डचे अधिकारी, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, नागवा हडफडेचे सरपंच श्रीकृष्ण नागवेकर उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Michael Lobo</p></div>
चोडण पुलाबाबतची सरकारी घोषणा फसवी: काँग्रेसचे ऍड. प्रभूगावकर यांचा दावा

राज्यातील कचऱ्याची वाढती समस्या पाहाता गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात कचरा प्रकल्प आवश्यक आहेत. येत्या मार्च ते एप्रिल महिन्याच्या मध्यावर दक्षिणेतील काकोडा आणि तिसवाडीतील बायंगिणी प्रकल्प मार्गी लागणार असल्याचेही मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी मतदारांवर!

मी गेली पंधरा वर्षे भाजपात (BJP) आहे आणि पक्ष सोडण्याचा मनात विचार आल्यास सर्वप्रथम स्थानिक प्रसार माध्यमांद्वारे राज्यातील तसेच देशातील पर्यायाने जगातील लोकांना माहिती देणार आहे. मी माझी पत्नी काँग्रेसमध्ये (Congress) जात असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. माझी कोणाशीही बोलणी झालेली नाही. आमची उमेदवारी मतदारच ठरवतील, असे मायकल लोबो (Michael Lobo) म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com