मये : मये तसेच डिचोलीतील काही भागांत उघड्यावर धूम्रपान, हा चिंतेचा विषय बनला आहे. उघड्यावरील धूम्रपानामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही धोका संभवत आहे. शिवाय ग्रामीण भागातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे आढळून आले आहे. मये, डिचोलीच्या अनेक भागांत परप्रांतीय कामगार उघड्यावर धूम्रपान करताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक युवा पिढी व्यसनांच्या आहारी गेलेली दिसून येते. परप्रांतीय कामगार खुलेआम उघड्यावर धूम्रपान करतात आणि तंबाखू, पान खाऊन रस्त्याच्या कडेला थुंकतात.त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
गोव्यातील प्रख्यात ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. शेखर साळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कर्करोग आणि इतर अनेक रोगांचे तंबाखू हे प्रमुख कारण आहे. तंबाखूला आळा घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण नियमांसह सक्रिय पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री
काही तरुण-तरुणी अमली पदार्थांच्या आहारी जात असून, सिगारेटच्या माध्यमातूनही अमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. शिवाय तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने तसेच हॉटेलमधून खुलेआम विक्री केली जात असल्याचेही आढळून येते. डिचोलीतील वॉकिंग ट्रॅकच्या संरक्षण भिंतीवर बसूनही काही तरुण मद्यप्राशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
सिगारेट आणि तंबाखूचे सेवन हे कर्करोग आणि अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे. धूम्रपान केवळ एखाद्या व्यक्तीसाठीच नाही तर त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठीही हानिकारक आहे. तंबाखूमुळे जगभरात दर मिनिटाला १० लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूचे सेवन बंद केल्यास हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
- डॉ. शेखर साळकर, ऑन्कॉलॉजिस्ट.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.