Maye: जनतेला मूलभूत सुविधा देण्यास कटिबद्ध - प्रेमेंद्र शेट

पिळगावात जलवाहिनी योजनेची आमदारांकडून पायाभरणी
work
workDainik Gomantak
Published on
Updated on

Maye: मये मतदारसंघात विकासाची गंगा आणतानाच, जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी दिली. पिळगाव पंचायत क्षेत्रात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाची मंगळवारी पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी जि. पं. सदस्य महेश सावंत, पिळगाव सरपंच मोहिनी जल्मी, उपसरपंच सुनील वायंगणकर, पंच स्वप्‍निल फडते, उमाकांत परब गावकर, उज्‍ज्वला बेतकीकर, माजी सरपंच प्रदीप नाईक, नीलेश जल्मी, संदीप सालेलकर, दिलीप गावस, माजी उपसरपंच ललना गिमोणकर, जि. पं. माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, नीतू देविदास, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता तिवरेकर, दत्तराज काकोडे आणि अभिजित नाईक उपस्‍थित होते.

work
Ashwem Beach: बदलते वातावरण सागरी कासवांना मारक

अनुसूचित जमाती निधीतून जलवाहिनी योजना मार्गी लावण्यात येणार आहे. बागवाडा, माठवाडा, सारमानस ते पिळगाव जंक्शनपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात येईल. या कामावर दीड कोटी रुपये खर्च येणार आहे.

या योजनेमुळे दीड हजारांहून अधिक लोकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होणार आहे. त्‍यामुळे त्‍यांची पाण्‍याची समस्‍या सुटण्‍यास मदत होईल. गेल्‍या अनेक वर्षांपासून या भागातील लोकांचे पाण्‍यासाठी हाल होत होते. मात्र आता ही समस्‍या सुटण्‍याची अपेक्षा निर्माण झाल्‍याने ग्रामस्‍थांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com