Goa Monsoon Update: गोव्यात मॉन्सूनची सलामी

राज्यात विलंबाने आगमन झाल्याने 41.9 % तूट
Monsoon
Monsoon Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update: केरळात आठ दिवस उशिरा दाखल झालेला नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे सर्वांचेच अंदाज चुकवत अवघ्या तीन दिवसांत राज्यात दाखल झाला आहे.

नैऋत्य मॉन्सूनने आता दक्षिण महाराष्ट्र व्यापत रत्नागिरीपर्यंत मजल मारली आहे. राज्यात यंदा मॉन्सूनचे आगमन सहा दिवसांनी लांबले आहे. त्यामुळे 41.9 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अधिक गतिमान झाले असून ते गुजरातच्या कच्छ भागाला आणि पाकिस्तानातील कराची किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

या चक्रीवादळामुळे विक्रमी तीन दिवसांत राज्यात दाखल झाला आहे. कालपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडला असला, तरी अपेक्षेप्रमाणे तो झाला नाही. हलक्या सरींनीच आज राज्याला मॉन्सूनने सलामी दिली.

हवामान खात्याने आज सकाळी देशभरातील हवामान केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॉन्सूनची आढावा बैठक घेतला आणि त्यांनी नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंतची आगेकूच जाहीर केली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नैऋत्य मॉन्सून सर्वसाधारणपणे 1 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीमध्ये दाखल होतो आणि तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत संपूर्ण देश व्यापतो. अलीकडच्या काही काळामध्ये पाऊस उशिरा दाखल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Monsoon
Goa Police: हरियाणा खंडणी प्रकरणातील आरोपीला सांगोल्डा येथून अटक

अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय नामक चक्रीवादळ अधिक सक्रिय होईल आणि ते उत्तर पश्चिम भागाकडे सरकेल आणि नंतर 15 जूनच्या दरम्यान गुजरातच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या कराची समुद्रकिनाऱ्यावर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. यामुळे या संपूर्ण किनारपट्टीवरील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून काही दिवस किनारपट्टीवर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

राज्यात सहा ठिकाणी झाडांची पडझड

राज्यात सहा ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या मध्यरात्रीपासून आलेल्या कॉलनुसार सांताक्रूझ येथील ग्रीन व्हॅलीच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळल्याचे नोंद झाले आहे.

त्याशिवाय पणजीतील मासळी मार्केटजवळ व गावडोंगरी येथे झाड कोसळले, पर्रा (बार्देश) येथे माड कोसळला. वास्को येथे मांगुर स्पोर्टस क्लबजवळ झाड कोसळले.

मांगोरहिल -वास्को येथे झाडाची फांदी मोडून पडली. तसेच आल्तिनो-पणजी येथील आकाशवाणी परिसरातील गुलमोहराचे झाड संरक्षक भिंतीवर कोसळले.

Monsoon
Mapusa News: खोर्ली-म्हापशातील साकव नादुरुस्त; नगरपालिकेकडून वाहतूक बंद

41.9 टक्के पावसाची कमतरता

राज्यात आज मॉन्सूनच्या सरी दाखल झाल्या असल्या, तरी तब्बल सहा दिवस पाऊस उशिराने पडत आहे. याशिवाय मॉन्सूनपूर्व पाऊसही झाला नाही. त्यामुळे पावसाची ४१.९ टक्के इतकी लक्षणीय तूट जाणवत आहे. १ जूनपासून केवळ ६०.५ मि.मी. पाऊस पडला आहे.

जो सामान्यपणे १०४ मि. मी.ने कमी आहे. पणजीत गेल्या २४ तासांत ४९.२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून एकूण हंगामी पावसाची नोंद ५२.७ मि.मी. झाली आहे. ती सरासरीपेक्षा १७४.४ मि. मी.ने कमी आहे.

अवघ्या तीन दिवसांत आगमन : यंदा तब्बल आठ दिवस उशिरा म्हणजे ८ जून रोजी नैऋत्य मॉन्सूनने केरळ व्यापला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याने कर्नाटक व्यापत कारवारपर्यंत धडक मारली.

सर्वसाधारण अंदाजानुसार केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून सहा दिवसांमध्ये गोव्यात येतो. मात्र आज ११ जून रोजी अवघ्या तीन दिवसांत संपूर्ण गोवा व्यापत महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र व्यापला आहे.

Monsoon
दुर्दैवी घटना ! झाड कोसळून माय-लेकाचा अंत; बेतकी-खांडोळ्यातील घटना

तापमानात किंचित घट

राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे. आज पणजीत कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. जे सामान्य सरासरीपेक्षा 2.8 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.

अधिक सक्रिय होणार

पुढील 48 तासांत आणखी सक्रिय होऊन मॉन्सून बंगालचा उपसागर, ईशान्येकडील राज्यांचा उर्वरित भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहारचा काही भाग व्यापणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com