Goa Taxi: किनारी भागातल्या टॅक्सी व्यावसायिकांचे काय? उत्तर गोवा टॅक्सी समितीची स्वतंत्र काऊंटरची मागणी

Goa Taxi Operator: चोपडे, मोरजी, मांद्रे, हरमल, पालये व केरी या किनारी भागातील टॅक्सी व्यवसायिकांना मोपा विमानतळावर विशेष लाभ होत नाही
Goa Taxi Operator: चोपडे, मोरजी, मांद्रे, हरमल, पालये व केरी या किनारी भागातील टॅक्सी व्यवसायिकांना मोपा विमानतळावर विशेष लाभ होत नाही
Goa Taxi DriverDainik Gomantak
Published on
Updated on

North Goa Taxi Committee

हरमल: पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांना मोपा मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संधी असली तरी चोपडे, मोरजी, मांद्रे, हरमल, पालये व केरी या किनारी भागातील टॅक्सी व्यवसायिकांना याचा विशेष लाभ होत नाही, त्यामुळे या टॅक्सी व्यवसायिकांना स्वंतत्र काऊंटर उपलब्ध करून देण्याची मागणी उत्तर गोवा टॅक्सी समितीचे सदस्य प्रवीण वायंगणकर यांनी केली आहे.

पेडणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध टॅक्सी घटकांना सामावून घेणे सरकारचे कर्तव्य आहे. सध्या मोप विमानतळावर पेडण्यातील टॅक्सी व्यवसायिकांना संधी मिळते, मात्र किनारपट्टी व नजीकच्या भागातील टॅक्सी व्यावसायिकांना याचा लाभ होत नाही, असे वायंगणकर यांनी सांगितले. यासंदर्भात मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल, असे वायंगणकर यांनी सांगितले.

Goa Taxi Operator: चोपडे, मोरजी, मांद्रे, हरमल, पालये व केरी या किनारी भागातील टॅक्सी व्यवसायिकांना मोपा विमानतळावर विशेष लाभ होत नाही
Goa Taxi Driver Protest: ॲपचा विषय मागेच पडला! पेडणे तालुका समितीचा टॅक्सी व्यावसायिकांसाठी होता प्रस्ताव

बेरोजगार युवकांनी सरकारच्या योजनेखाली लाभ घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांची सबसिडी बंद करून अन्य लोकांना त्याचा लाभ देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्‍न टॅक्सी व्यावसायिक प्रदीपन वस्त यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com