Vasco : म्हादईतील पाणी वळवण्याच्या विरोधात तसेच एमपीएत कोळसा हाताळणी विरोधात मुरगाव बंदर प्राधिकरणाबाहेर तसेच वास्कोत रॅली काढून आज सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी निदर्शने केली.
आमची म्हादई वाचवा तसेच कोळसा हाताळणी बंद करा, अशी मागणी करत राज्य सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दक्षिण गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वास्कोत म्हादई नदी पाणी वळवण्याच्या विरोधात तसेच मुरगाव पोर्ट ट्रस्टचा कोळसा विस्तार संदर्भात लढा देण्यासाठी वास्कोत रॅली काढली.
रॅली वास्को रेल्वे स्थानकाकडून सुरू करून मुरगाव पालिका इमारती समोरून, टिबीकुन्हा चौक व परत रेल्वे स्थानकासमोर आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘आमका नाका आमका नाका, कोळसो आमका नाका’, अशा घोषणा दिल्या.
सध्या कोळसा वाहतुकीची मर्यादा झिंदाल कंपनीला 6 अब्ज टनांवरून 13 ते 15 अब्ज टन एवढी वाढवून दिल्ली आहे. हा निर्णय जनविरोधी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच बागलकोट-गदग-विभागात प्रस्तावित असलेल्या म्हादईचे पाणी पोलाद प्रकल्पासाठी वळवण्याच्या कर्नाटकच्या उघड आणि गुप्त योजना आहे.
हे दोन मुद्दे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे लोकांना समजावून सांगण्यासाठी ही जनजागृती कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते आणि गोएंचो लोकांच्या बॅनरखाली सार्वजनिक उत्साही नागरिकांनी सुरू केला आहे.
सरकारविरोधात घोषणाबाजी
आज सकाळी 11.30 वाजता रॅली वास्को रेल्वे स्थानकासमोरून सुरू करण्यात आली. सरकारविरोधात घोषणा देत रॅली टीबी कुन्हा चौक व पुन्हा रेल्वे स्थानकासमोर आली. यानंतर आंदोलकांनी हेडलॅण्ड सडा येथे एमपीएच्या प्राधिकरणाबाहेर जाऊन निदर्शने केली.
तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी एमपीए प्राधिकरणात अध्यक्षांना कोळसाविरोधात निवेदन दिले. यावेळी एमपीए प्राधिकरणा बाहेर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.