Kadamba Employees: कदंब कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Kadamba Employees: कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे.
kadamba employee protest
kadamba employee protestDainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba Employees: कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असे आयटक या कामगार संघटनेचे सचिव कामगार नेते अॅड. सुहास नाईक यांनी सांगितले.

सातव्या वेतन आयोगाबाबत कर्मचारी संघटनेसोबत करार करणे, ३४ महिन्यांची थकबाकी देणे, २००९ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारावर १२ टक्के पीएफ लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी कदंब कर्मचाऱ्यांनी बुधवारी पणजीतील आझाद मैदानावर साखळी धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

kadamba employee protest
Minister Govind Gaude: गावडेंनी राजीनामा देऊन प्रायश्‍चित्त घ्‍यावे!

याबाबत कामगार नेते वकील सुहास नाईक यांनी माहिती दिली. कोणत्याही महामंडळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर तेथे काम करणाऱ्या कामगार संघटनेसोबत करार करणे आवश्यक आहे. कदंब महामंडळाने सातव्या वेतन आयोग लागू केला तरी अजून त्याबाबत करार केला नाही. तो त्वरित करणे आवश्यक आहे. याशिवाय कामगारांना आयोग लागू झाल्यापासून ३४ महिन्यांची थकबाकी देणे देखील आवश्यक आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

kadamba employee protest
Goa News: ‘भावकई’ची निवडणूक रद्द

कंत्राटी कामगारांना कायम करावे, अशी देखील मागणी आम्ही केली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांचा १२ टक्के पीएफ कापला जात होता. मात्र महामंडळाने कर्मचाऱ्यांना न सांगता ही रक्कम कमी केली आहे. तसेच गोवा-मुंबई, गोवा-शिर्डी या मार्गावरील सेवा खाजगी बस चालकांकडे न देणे, बदली चालकांना समान वेतन देणे अशा मागण्या देखील आम्ही केल्या आहेत, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com