
Priyanka Gandhi Parliament Speech: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी (13 डिसेंबर) 14 व्या दिवशी संविधान रक्षणाच्या मुद्यावर घमासान पाहायला मिळालं. वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणातून केंद्रातील एनडीए सरकारला धारेवर धरले. संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर गोव्याचे उदाहरण देत प्रियांका यांनी टीकास्त्र डागले. प्रियांका म्हणाल्या की, ''केंद्रातील मोदी सरकारने गोवा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटकातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे उलथवून लावली.'' एवढ्यावरच न थांबता प्रियांका पुढे म्हणाल्या की, ''आजचे राजे टीकेला घाबरतात. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकतात. त्यांचा छळ करतात. देशात सध्या भीतीचे वातावरण आहे.''
मला इथे एक आठवण करुन द्यायची आहे की, इंग्रजांच्या राजवटीत देशात असेच भीतीचे वातावरण होते. जेव्हा या बाजूला बसलेले गांधी विचारसरणीचे लोक स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा दुसऱ्या विचारसरणीचे लोक इंग्रजांशी हातमिळवणी करत होते. पण भीतीचाही स्वतःचा स्वभाव असतो. भीती पसरवणारे स्वतःच भीतीचे बळी ठरतात. आज त्यांची अवस्था तशीच झाली आहे. भीती पसरवण्याची त्यांना इतकी सवय झाली आहे की, त्यांना चर्चेची भीती वाटते. टीकेची भीती वाटते, असेही प्रियांका यांनी पुढे बोलताना नमूद केले.
पूर्वी राजा टीका ऐकण्यासाठी वेश बदलून जनतेत जात असत. पण आजचे राजे वेश बदलतात, वेश बदलण्याचा त्यांना शौकच आहे. त्यांची जनतेत जाण्याची हिंमत नाही की टीका ऐकण्याचेही नाही. मला आश्चर्य वाटते की देशात इतके ज्वलंत मुद्दे आहेत, पण पंतप्रधान दिवसातून फक्त 10 मिनिटेच दिसतात. गोष्ट अशी आहे की, हा देश भीतीवर नाही, तर धैर्य आणि संघर्षावर उभा आहे. देशातील जनतेने हा देश घडवला. संविधानाने त्यांना संरक्षण दिले, असेही प्रियांका शेवटी म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.