Goa Government: गोवा सार्वजनिक आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांना कारवाईचा इशारा देणारे नवे परिपत्रक जारी केले आहे. रुग्णाला शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयांत पाठवणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नव्या परिपत्रकात आरोग्य विभागाने 'जादा शुल्क आकारून' हे शब्द काढून टाकले आहेत.
राज्यातील अनेक खासगी इस्पितळे रुग्णाला शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णालयांत ठेवून घेतात आणि रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालयाचा खर्च घेउन त्याला सरकारी रुग्णालयांत नेण्यास सांगतात असे प्रकार राज्यात उघडकीस येवू लागले आहेत. कोविड काळात राज्यात असे प्रकार सातत्याने समोर आलेले होते. त्यानंतरही असे प्रकार सुरुच असल्यामुळे सरकारने थेट कारवाईचा बडगा उचलला आहे.
नातेवाईकांकडून रुग्णालयाचा खर्च घेवून रुग्णाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह (गोमेकॉ) इतर सरकारी रुग्णालयात पाठवणाऱ्या खासगी रुग्णालयांची चौकशी करावी आणि असे प्रकारे करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी असे निर्देश आरोग्य खात्याने गोमेकॉचे डीन, आरोग्य संचालक, बांबोळीतील दंत महाविद्यालयाचे डीन, मानसोपचार आणि मानवीवर्तन संस्थेचे (आयपीएचबी) डीन यांना दिले आहेत. आरोग्य खात्याच्या अवर सचिव तृप्ती मणेरीकर यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.