John Stephen D'Souza
John Stephen D'SouzaDainik Gomantak

Goa Drugs Case : हिलटॉप नाईट क्लब मालक स्टीव्ह डिसोझाला हैदराबाद पोलिसांकडून पुन्हा अटक

स्टीव्ह डिसोझाला ड्रग्ज तस्करीप्रकरणी हैदराबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली होती
Published on

Goa Drugs Case : हिलटॉप नाईट क्लब मालक स्टीव्ह डिसोझा यांना ड्रग्ज तस्करीप्रकरणी हैदराबाद पोलिस पथकाकडून अटक करण्यात आली होती. यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्याचा ट्रान्झिट वॉरंट घेवून हे पथक परत हैदराबादला रवाना झाले होते. यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

दरम्यान, स्टीव्ह डिसोझा यांना पीट एनडीपीएस कायद्याअंतर्गत तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांना दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. पूर्वीच्या गुन्ह्यात हैदराबाद पोलिस स्थानकात हजेरीवेळी त्यांच्यावर कारवाई केली होती.

John Stephen D'Souza
Fraud In Vasco: फ्लॅट, प्लॉट देण्याच्या बहाण्याने वास्कोतील अनेकांची फसवणूक

हैदराबाद पोलिसांचं पथक गोव्यात तळ ठोकून होते. हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणात गोव्यात ड्रग्ज तस्करीमध्ये गुंतलेल्यांची नावे समोर आल्याने हे पथक गोव्यात आले होते. गोव्यात सोमवारी आलेल्या हैदराबाद पोलिस पथकाने राज्याचे पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांची भेट घेऊन घेतली. तेलगंणा व गोवा या राज्यांमधील ड्रग्ज दलाल-विक्रेते यांचे रॅकेट यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे निरीक्षकांशी चर्चा करून ड्रग्जसंदर्भात माहिती घेतली.

John Stephen D'Souza
Sonsodo : सोनसोडो कब्रस्थानाच्या जागेवरुन नवा वाद; रेखांकनापूर्वी नोटीस न पाठवल्याने नाराजी

काही दलाल गोव्यातून तेलगंणात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा संशय हैदराबाद पोलिसांना आहे. याप्रकरणी तेथील पोलिसांनी हणजुण येथील एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासासाठी हैदराबाद पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक राज्यात दोन दिवसांच्या भेटीवर आले होतं. अटकेत असलेला ‘कर्लिस’चा चालक एडविन नुनीस याचीही ते चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हिलटॉप नाईट क्लब मालक स्टीव्ह डिसोझा याला अटक करुन हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com