गॅसचा भडका: गोव्यातील गृहीणींना 25 रुपयांनी झटका

रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या बायकांनी घरखर्च कसा भागवावा? गॅस कधी स्वस्त होणार? याची आम्ही वाट पहायची का?"
Gas cylinder
Gas cylinderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे (Fuel price hike) सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच काल बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Company) सिलिंडरच्या (Gas cylinder )दरात पुन्हा वाढ केली. 25 रुपयांनी ही दरवाढ झाल्याने गोमंतकीयांच्या (Goa) खिशाला चाप बसणार आहे.

गोव्यातील घरगुती गॅस सिलिंडरच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर 873.50 रुपये झाला आहे. जुलै महिन्यात तो 848.50 इतका होता. 25 रुपयांनी झालेली ही वाढ गृहिणींच्या आर्थिक नियोजनावर प्रभाव टाकणारे ठरणार आहे. गेल्या सहा महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल तीनवेळा वाढ झाली असून गोव्यात मार्च महिन्यात सिलिंडरचा दर 808 रुपये होता. 2008 मध्ये जानेवारी महिन्यात सिलिंडरचा दर 752 रुपये होत

Gas cylinder
Goa : ‘दाबोळी’च्या शहरीकरणाला समस्‍यांचा विळखा

राज्यातील 7 लाख ग्राहकांना फटका

राज्यातील सुमारे 7 लाख ग्राहकांना फटका बसणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमचे (एचपी) गोव्यातील अधिकारी आर. मित्तल म्हणाले, राज्यात 4 लाख 30 हजार सिंलिंडर एचपीचे आहेत. तर भारत गॅस, इंडियन ऑइल आदी इतर कंपन्यांचे सुमारे 2 लाख 70 हजार ग्राहक आहेत.

"जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. तरी त्याचे दर वारंवार का वाढतात? घरात सरकारी नोकर असलेल्यांचे ठीक आहे. पण रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या बायकांनी घरखर्च कसा भागवावा? गॅस कधी स्वस्त होणार? याची आम्ही वाट पहायची का?"

- कल्याणी पेडणेकर, डिचोली

Gas cylinder
Goa: परराज्यातील वाहनचालक थेट गोव्यात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com