Goa : ‘दाबोळी’च्या शहरीकरणाला समस्‍यांचा विळखा

Goa : गुन्‍हेगारीवर अंकुश ठेवण्‍यासाठी हवे स्‍वतंत्र पोलिस स्‍थानक
Goa : Dabolim Vasco Over Bridge road.
Goa : Dabolim Vasco Over Bridge road.Dainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी : दाबोळी मतदारसंघ (Dabolim Constituency) हा शहरी भाग बनू लागल्यानंतर मतदारसंघात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. साधनसुविधांवर ताण येत असल्याने लोकांना त्रास होत आहेत. कचरा समस्येने (Garbage Problems) तर लोकांना हैराण केले आहे. मतदारसंघात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलिस स्थानकाची गरज आहे. सध्या हा परिसर वास्को पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येत आहे. नवेवाडे येथे पोलिस चौकी सुरू झाली होती, पण सध्या ती बंद आहे. मलनिस्सारण प्रकल्प या ठिकाणी आवश्‍यक आहे. मतदारसंघात एका बहुउदद्देशीय सभागृह (Multipurpose Hall) असावे, असे लोकांना वाटते. चिखली येथील वाहतूक बेटाजवळील खुल्या जागेचे सुशोभिकरण केल्यास ते एक पर्यटनस्थळ होऊ शकते.

Goa : Dabolim Vasco Over Bridge road.
Goa:चतुर्थीतील कोटींची उलाढाल ठप्प...

दाबोळी मतदारसंघ हा पूर्वी कुठ्ठाळी मतदारसंघाचा भाग होता. कुठ्ठाळीतून चिखली व बोगमाळो पंचायत वगळून या दोन्ही पंचायतीसह मुरगाव नगरपालिकेचे नवेवाडे येथील १ ते १५ पर्यंतच्या प्रभागांचा समावेश करून दाबोळी मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. या मतदारसंघाचे सर्वप्रथम प्रतिनिधीत्व माविन गुदिन्हो करीत आहेत. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार तथा मंत्री माविन गुदिन्हो यांनी काम केले आहे. चिखली येथील जिल्हास्तरीय इस्पितळाचे विस्तारीकरण व सुधारणा केल्याने येथे अनेकांची सोय झालेली आहे. चिखलीतील जॉगर्स पार्कही उपयुक्त ठरले आहे. पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचेही काम सध्या सुरू आहे. वाडे तळ्याच्या सौंदर्यीकरणामुळे परिसराला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झालेले आहे. दाबोळी विमानतळाबाहेर होणारी वाहनांची कोंडी ग्रेड सेपरेटर, उड्डाण पूल यामुळे सुटली आहे. चिखली येथील क्रीडा मैदानाचे नूतनीकरण सुरू आहे.

कचरा समस्‍या ठरतेय डोकेदुखी
या मतदारसंघात विकासकामे होत असली तरी लोकांच्या अडचणीही अनेक आहेत. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत व्हावा, पाणी पुरवठ्याची समस्या दूर करणे आवश्‍यक आहे. कचरा समस्या ही सर्वांत मोठी डोकेदुखी असून नवेवाडे येथील सुशिक्षित नागरिक आपला कचरा आणून रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. या समस्येवर त्वरित तोडगा काढायला हवा. नगरपालिकेचे कामगार कचरा काही प्रमाणात उचलतात, मात्र झाडांच्या पानांचा पालापाचोळा मात्र काढत नाहीत. यामुळे एक प्रकारे रस्त्याच्या कडेला विद्रुप स्वरुप लाभलेले पाहावयास मिळते. येथील रस्त्यांच्या बाजूला योग्य गटार व्यवस्था नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही.

रस्‍त्‍यांची स्‍थिती खराब
चिखली औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची स्थिती एकदम खराब झाली आहे. या परिसरात वाहन चालकांना शिकाऊ परवाने देण्यासाठीच्या चाचणीसाठी आणले जाते. रस्ते चांगले नसल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपट उडते. या वसाहतीमधील बंद पडलेले उद्योग पूर्ववत केल्यास अनेकांना रोजगार मिळू शकतो. विमानतळाबाहेर सध्या वाहन पार्किंगची समस्या आहे. या परिसरामध्ये सध्या नवनवीन बांधकामे उभी राहत असल्याने त्याचा नागरी साधनसुविधांवर ताण पडत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com