Heavy vehicles parked in Chorla Ghat, Goa, 18 august2021.
Heavy vehicles parked in Chorla Ghat, Goa, 18 august2021.Gomantak

Goa: परराज्यातील वाहनचालक थेट गोव्यात

केरीत तपासणीकडे दुर्लक्ष, तिसऱ्या लाटेची शक्यता (Goa)
Published on

पणजी (प्रतिनिधी)ः( Panaji)कोरोनावर (Covid) नियंत्रण आणण्यासाठी सरकार एका बाजूने निकराचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूने गोव्याच्या परराज्यातील ट्रकचालकांसह अनेक लोकांना कोरोना चाचणीशिवाय गोव्यात दाखल होत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली आहे. चोर्लाघाटातून (Chorla Ghat) येणाऱ्या ट्रक (Truck) चालक, वाहकांची तपासणी केली जात नाही. ते रात्री उशिरा गोव्यात (Goa) दाखल होता, तेव्हा त्यांच्याकडून दंड आकारला जातो, पण कोविड तपासणीकडे दुर्लक्ष केले जाते. निगेटिव्ह प्रमाणपत्र नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वाहनांतून किंवा बसमधून उतरवून त्यांच्याकडून २७० रुपये घेऊन त्यांची तपासणी सीमेवर केली जाते. मात्र, ट्रकचालक व त्यामधून येणाऱ्या इतर नागरिकांना तसेच सोडून दिले जाते. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होतेच, पण राज्यात कोरोना पुन्हा वाढण्याची भीतीही वाढली आहे.

Heavy vehicles parked in Chorla Ghat, Goa, 18 august2021.
गोव्याच्या सीमा खुल्या करण्यापूर्वी कोविड चाचणीची सोय करा

१२ ते १६ टायरचे हे ट्रक दिवसा गोव्यात येत नाहीत. (Heavy vehicles) चोर्ला घाटात रस्त्याच्याकडेला उभे केले जातात. ड्युटीवरील पोलिस, वाहतूक पोलिस व इतर खात्यांचे वरिष्ठ अधिकारी रात्री १० नंतर नाक्यावर न थांबता घरी जातात आणि त्यानंतर हे अवजड ट्रक केरी चेक नाक्यावरून बिनदिक्कत गोव्यात दाखल होतात. मात्र त्या ट्रकांचे चालक किंवा त्यामध्ये असलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही.

कोटींचा खर्च वाया
पावसाळ्यापूर्वी चोर्लाघाट रस्त्याचे १० कोटी रुपये खर्च करून हॉटमिक्सिंग केले होते. पण पहिल्याच पावसाळ्यात हा रस्ता काही ठिकाणी खराब झाला असून मो़ठे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे घातक ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com