Goa BJP: भाजप मुख्यालयात प्रत्येक 'कार्यकर्त्या'साठी स्थान, डिसेंबरपर्यंत इमारत पूर्ण; मुख्यमंत्र्यांची प्रदेशाध्यक्षांसोबत पाहणी

Goa BJP Office: भाजप मुख्यालयाची तयार होत असलेली इमारत डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि जानेवारी २०२६ पर्यंत कार्यालय हलवले जाईल.
Goa BJP Office
CM Pramod Sawant, Damu Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

BJP Office Building Inspection Goa

पणजी: भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांचा सत्ताधारी आमदार मंत्र्यांच्या बैठकीत काल (मंगळवारी) रात्री सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज त्यांच्यासोबत भाजप कार्यालय इमारतीचे काम असलेले ठिकाण गाठले. तेथे पाहणी केल्यानंतर यंदा डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या वर्षी २० जुलै रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले की, भाजपची गोवा मुख्यालय इमारत, जी जुनेगोवे बगल मार्गावर आहे ती डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होईल.

मुख्यमंत्री सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार आणि भाजप गोवा आयटी सेल समन्वयक सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांच्यासह कदंबा पठार येथील नवीन कार्यालयाच्या बांधकामाची प्रगती तपासली.

Goa BJP Office
Goa BJP: 4 वर्षे भाजप कार्यालयाकडे न फिरकलेले 'दामूं'च्या निवडीनंतर सक्रिय; दिल्‍ली दौऱ्यामुळे उंचावल्‍या अनेकांच्‍या अपेक्षा

२०२७ ला पूर्ण बहुमताने विजय!

भाजप मुख्यालयाची तयार होत असलेली इमारत डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि जानेवारी २०२६ पर्यंत कार्यालय हलवले जाईल; २०२७ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पक्ष विस्तारामुळे प्रशस्त कार्यालयाची गरज निर्माण झाली आहे. नवीन कार्यालय इमारत पक्षाच्या कार्यांची कार्यक्षमता सुधारेल, आणि येथे प्रत्येक ''कार्यकर्ता''साठी एक स्थान असेल, जे गोव्याच्या लोकसेवेसाठी कष्ट करण्यासाठी प्रेरणा देईल. भाजप मुख्यालयात आधुनिक सुविधा असतील. ‘त्यात ई-लॅब, लायब्ररी, संशोधन केंद्र आणि आमच्या नेत्यांसाठी खोल्या असतील, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com