Goa BJP: 4 वर्षे भाजप कार्यालयाकडे न फिरकलेले 'दामूं'च्या निवडीनंतर सक्रिय; दिल्‍ली दौऱ्यामुळे उंचावल्‍या अनेकांच्‍या अपेक्षा

Damu Naik Delhi Visit: दामू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हापसा येथील कार्यकर्ता मेळाव्यात बेशिस्त खपवून घेणार नसल्याची घोषणा केली होती.
Damu Naik Delhi Visit
Damu Naik, B L SantoshDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचा दिल्‍ली दौरा बहुचर्चित ठरला आहे. राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्‍यासोबत त्‍यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

दामू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हापसा येथील कार्यकर्ता मेळाव्यात बेशिस्त खपवून घेणार नसल्याची घोषणा केली होती. त्‍यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रत्येकाचे वर्तन हे त्याच्याविषयी पुढील निर्णय घेताना विचारात घेतले जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर

Damu Naik Delhi Visit
Damu Naik: सूत्रे स्वीकारली, आता आव्हानांची जबाबदारी! दामू नाईकांना सोडवावे लागणार 'हे' प्रश्न

लगेच ते दिल्लीला गेल्याने प्रदेश समिती, जिल्हा समित्या, विविध मोर्चाचे निमंत्रक आणि सदस्य यांच्या नियुक्त्यांबाबत त्यांच्या मनात निष्ठावान कार्यकर्त्यांना झुकते माप देण्याचा विषय असावा, असा अंदाज लावला जात आहे.

प्रदेश पातळीवर नव्या जबाबदार पदाधिकाऱ्याची निवड झाल्यावर दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची पद्धत भाजपमध्ये आहे. त्या शिरस्त्यानुसार दामू हे दिल्लीला जाणार, हे आधीच ठरले होते. त्यांच्या सोबतीने मुख्यमंत्र्यांनीही आपल्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन करून राज्यात पक्ष संघटना आणि सरकार यांच्यात किती दिलजमाई आहे, याचे दर्शन घडविले.

Damu Naik Delhi Visit
Damu Naik: 'जेथे चूक आहे, तेथे चूकच म्हणणार'! दामू नाईकांचा इशारा; पर्रीकरांच्या आठवणींना दिला उजाळा

कार्यकर्ते पुन्‍हा वळले पक्ष कार्यालयाकडे

मंत्रिमंडळातून एखाद्याला वगळण्याचा निर्णय असेल तर तोही संतोष यांच्या मान्यतेनेच कार्यवाहीत आणला जातो. कधी कधी थेट त्या मंत्र्याला बोलावून संतोष हेच त्याची कल्पना देतात यावरून पक्षातील त्यांचे स्थान अधोरेखित होते.

भाजप कार्यालयात गेल्या चार वर्षांत न फिरकलेले अनेकजण दामू प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्ष कार्यालयात आल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे संतोष यांच्यासोबत या विषयावर दामू यांनी चर्चा केल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com