National Sports Competition: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीला वेग, गोव्यातील 37 खेळांची निश्चिती

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ः पुढील आठवड्यात पी. टी. उषा गोव्यात
National Sports Competition
National Sports CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

National Sports Competition या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोव्यात नियोजित असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासमवेत एकंदरीत आढावा घेत सादरीकरण पाहिले आणि आवश्यक सूचनाही केल्या.

गेल्या आठवड्यात भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) स्पर्धा आयोजन तांत्रिक समितीचे प्रमुख अमिताभ शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने विविध खेळांच्या स्पर्धा आयोजन केंद्रांना भेट देऊन पाहणी केली होती, तसेच आवश्यक सूचनाही गोवा क्रीडा प्राधिकरणास केल्या होत्या.

National Sports Competition
Goa Traffic Police: दुचाकीस्वारांबाबत गोवा वाहतूक पोलिसांनी घेतलाय 'हा' महत्वाचा निर्णय

आता तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात महान ॲथलीट आयओए अध्यक्ष पी. टी. उषा गोव्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी शुक्रवारी दिली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने उषा यांची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी भेट नियोजित असून बैठकीत इतर संबंधितांशीही त्या संवाद साधतील, असे क्रीडामंत्र्यांनी नमूद केले.

आतापर्यंत 37 खेळांची निश्चिती

आयओए स्पर्धा तांत्रिक समितीने आतापर्यंत गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी 37 खेळांची निश्चिती केली आहे. आणखी काही खेळांचा समावेश होण्याचे संकेत आहेत आणि याविषयी लवकरच घोषणा अपेक्षित आहे.

National Sports Competition
Energy Literacy Training Portal: सौर ऊर्जेच्या दिशेने सरकारचे एक पाऊल, जागरूकता वाढवण्यासाठी 'हे' पोर्टल झाले लाँच

तीस एप्रिलपर्यंत पाहणी पूर्ण:-

गतआठवड्यात स्पर्धेतील सात खेळांच्या तांत्रिकविषयक तज्ज्ञांनी राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली होती, पुढील आठवड्यात, 27 ते 29 एप्रिल या कालावधीत आणखी दहा खेळांचे तांत्रिक तज्ज्ञ गोव्याला भेट देतील व एकंदरीत आढावा घेतील, असे क्रीडामंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.

30 एप्रिलपर्यंत स्पर्धेतील सर्व खेळांच्या स्पर्धा केंद्रांची पाहणी पूर्ण होईल, असा विश्वास करून तांत्रिक शिष्टमंडळाच्या पाहणी आणि अहवाल प्रक्रियेनंतर खेळांच्या स्पर्धा केंद्रांवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे क्रीडामंत्र्यांनी पुढे सांगितले.

गतआठवड्यात सात खेळांची पाहणी

गतआठवड्यात आयओए तांत्रिक शिष्टमंडळाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने यॉटिंग, हॉकी, रोईंग, कॅनोईंग-कयाकिंग, गोल्फ, ॲथलेटिक्स, मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळांच्या केंद्राची पाहणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com