GMC मध्ये कोरोना रुग्णांचे मृत्यू रात्रीचेच का होत होते ?

GMC मध्ये झलेले 'मृत्यू' ऑक्सिजन सिलेंडर बदलताना झाले, असे प्राथमिक तपासात असे आढळून आले.
GMC
GMCDainik Gomantak

Goa: गोव्याचे शासकीय रुग्णालय जीएमसीमध्ये (GMC) मे महिन्यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या मृत्यूंच्या (Death at Night in GMC) प्रकरणात तपास समितीचा अहवाल समोर आला आहे. मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दुपारी 2 ते सकाळी 6 पर्यंत बरेच मृत्यू झाले (Covide Death). प्राथमिक तपासात असे आढळून आले की, हे मृत्यू ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder) बदलताना झाले. त्यानंतर सरकारच्या आदेशानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तीन सदस्यीय टीमने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, जीएमसीला रुग्णांची वाढती संख्या हाताळता येत नसुन त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत. अहवालात मात्र असे म्हटले आहे की, ऑक्सिजनच्या अभावामुळे (lack of oxygen) एकही मृत्यू झाला नाही. अहवालानुसार, यामध्ये जीएमसीने तज्ञांचे मत स्वीकारले नाही.

GMC
'तोडगा काढा अन्यथा'...: एसीजीएल कामगार संघटनेनं दिला इशारा

ऑक्सिजन ठेकेदाराने खाजगी रुग्णालयांमधून जीएमसीला माहिती न देता ऑक्सिजन देणे बंद केले, ज्यामुळे जीएमसीवर रुग्णांचा ताण वाढला. दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत म्हणाले की, 'या अहवालामुळे मृत्यूचे कारण काय होते हे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात भाजपला 'खुनी' म्हणणे योग्य आहे. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो की ऑक्सिजनमुळे मृत्यू होतात. आता हे पूर्णपणे सिद्ध झाले आहे त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी राजीनामा द्यावा.

GMC
गोवा विधानसभेचे कामकाज तहकूब!

विधानसभेतही अहवालाला मुद्दा बनवला जाईल!

दुसरीकडे, विरोधी पक्ष गोव्यातील दोन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करू शकतात. यावर्षी गोव्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, 10 मे ते 13 मे या कालावधीत गोव्याच्या सर्वात मोठ्या GMC रुग्णालयात दुपारी 2 ते सकाळी 6 या दरम्यान सलग तीन दिवस रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. रात्रीच्या वेळात एवढे मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय टीमची स्थापनाही केली होती, त्यांनी आता आपला अहवाल सादर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com