'तोडगा काढा अन्यथा'...: एसीजीएल कामगार संघटनेनं दिला इशारा

एसीजीएल कंपनीच्या (ACGL Company) दोन्ही कामगार संघटनेने (Trade Unions) आपल्या हक्काच्या मागणी साठी 15 दिवसांपूर्वी संपाची नोटीस दिल्या प्रमाणे आज दि 18 रोजी पासून पाच दिवसांच्या संपाची सुरवात झाली आहे.
 ACGL Trade Unions
ACGL Trade UnionsDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनी व्यवस्थापन, कामगार आयुक्त आणि सरकार यांच्या कडे पगार वाढीचा मुद्द्यावर चर्चा करून सुद्धा काहीच फायदा झाला नसल्याने एसीजीएल कंपनीच्या (ACGL Company) दोन्ही कामगार संघटनेने (Trade Unions) आपल्या हक्काच्या मागणी साठी 15 दिवसांपूर्वी संपाची नोटीस दिल्या प्रमाणे आज दि 18 रोजी पासून पाच दिवसांच्या संपाची सुरवात झाली आहे. त्यानुसार आज सकाळी बिबीडी आणि एस एम डी विभागातील कामगार एकत्रित येऊन एस एम डी विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर धरणे धरून घोषणा बाजी सुरू केली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारच्या वतीने विशेष काळजी म्हणून उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस निरीक्षक यांच्या सह मोठा पोलिस फौजफाटा सकाळी सात वाजता तैनात केला होता.

या वेळी कामगार संघटनेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार समजले की सन 2018 साली पगार वाढीचा करार संपुष्टात आला आहे, त्यावेळी पासून कंपनी कडे नवीन पगार वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनीने कामगारांनी सादर केलेल्या पगार वाढीचा मुद्द्यावर कोणताच सकारात्मक असा तोडगा काढला नाही, त्याच प्रमाणे सदर विषय कामगार आयुक्तांकडे दाखल करून सुद्धा काहीच निष्पन्न झाले नाही, त्यामुळे सदर कंपनीचे व्यवस्थापनान मनमानी करून कामगारांची विविध मार्गांनी सतावणूक करीत आहे, कंपनीचे कामकाज सुरळीत चालले असताना नुकसानीत चालत असल्याचा दावा करते, या उलट कंपनी व्यवस्थापनाने 2020 मध्ये आपल्या अधिकारी वर्गाला मात्र भरमसाठ वाढ देऊन त्यांना खुष केले, त्यावेळी कंपनीला नुकसान होत असल्याचे दिसून आले नाही काय? असा प्रश्न उपस्थित करून सदर कंपनीचे बदललेले व्यावस्थापन धोरण कामगार विरोधी आहे, त्यामुळे

 ACGL Trade Unions
Goa: युतीचे दारे बंदच असल्याने मगोची 20 जागांवर लढण्याची घोषणा

आज आयुष्यभर कंपनीच्या उभारणी साठी झटलेल्या कामगारांना उतारवयात असे रस्त्यांवर येण्याची पाळी आली आहे. याला पुर्ण पणे जबाबदार कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक प्रकाश नाईक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, कंपनीच्या वाईट काळात सुद्धा कामगारांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, पण बदलेल्या व्यवस्थापनाला यांची जाणीव नसल्याने कंपनीने कामगारांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा सुद्धा दर्जा घसरून कामगारांना वेठिस धरण्याचे सत्र अवलंबले आहे, त्यामुळे हे सगळे सहनशीलतेच्या पलिकडे जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या संपात दोन दिवस फक्त कामगारूच सहभागी झाले आहेत, उद्या दि 19 पर्यंत कंपनी व्यवस्थापन आणि सरकारने या प्रकरणी तोडगा न काढल्यास बुधवार पासून कुटुंबासमवेत रस्त्यावर उतरून न्याय मागण्यांची तयारी आहे, आणि यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला पुर्ण पणे कंपनी आणि सरकार जबाबदार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात सदर संपाची धार आणखीन त्रीव होण्याची शक्यता आहे.

 ACGL Trade Unions
Goa: सरकारचा खोटारडेपणा उघड, कोरोनात ऑक्सिजन कमतरतेमुळेच गोमेकॉत बळी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे मार्गदर्शन

सदर कंपनीचे व्यवस्थापन आणि सरकार सुध्दा आपल्या हक्काच्या मागण्या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून या कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेशी संलग्नित होऊन कायदेशीर बाबींचा त्याचा आधार घेतला आहे, त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत हाडगे आणि गणेश खंडारे यांनी येथे उपस्थिती लावून कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी यशवंत हाडगे यांनी सदर कंपनीत टाटा उद्योगसमूहाची 49 टक्के भागीदारी असून टाटा उद्योगसमूह हा देशात सामाजिक उपक्रमात करोडो रुपये खर्च करीत आहे, त्यात या कामगाराकडे लक्ष देऊन त्यांची समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे. त्याच प्रमाणे गणेश खंडारे यांनी मार्गदर्शन करताना सरकारने कामगार वर्गाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून या विषयी सुवर्ण मध्य काढावा अन्यथा बुधवार पासून हे कामगार कुटूबांसह रस्त्यावर उतरतील त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचा त्याना पुर्ण पाठिंबा असणार असल्याचे सांगितले.

सल्लागार सुभाष जॉर्ज नाईक यांचे मार्गदर्शन

यावेळी उपस्थित असलेले कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार सुभाष जॉर्ज नाईक यांनी सांगितले की कंपनीने आडमुठे धोरण अवलंबून कामगारांना हक्काच्या मागण्या पासून वंचित ठेवले आहे, त्यामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे, कायमस्वरूपी कामगारांना बाहेर काढून कंत्राटदारा मार्फत परप्रांतीय कामगारांना आणून काम करीत आहे, हे कामगार धोरणाच्या अगदम विरूद्ध असून या प्रकरणी कंपनीने त्वरित तोडगा काढून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. त्याच बरोबर यावेळी गुणाजी परब, सुभाष परब, प्रशांत खानोलकर, दिना नाईक या कामगार नेत्यांनी या वेळी कंपनी कडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.

 ACGL Trade Unions
Goa: भाजपने केला सदैव अन्याय; सुदीन ढवळीकर

शासकीय पातळीवरून पुर्ण दक्षता

सदर संपाची नोटीस दिल्यानंतर कामगारांच्या मागण्या संबंधी कोणताच तोडगा निघाला नसल्याने संप होणारच हे ध्यानात घेऊन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासकीय पातळीवरून बरीच खबरदारी घेण्यात आली होती, त्यामुळे आज सकाळी कंपनीच्या दोन्ही विभागाच्या गेटवर पोलिस फौजफाटा तैनात करतानाच दोन्ही ठिकाणी मामलेदार तसेच सत्तरीचे उपजिल्हाधिकारी, वाळपई व डिचोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक, हरीष गावस, महेश गडेकर महीला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा गावस या जातीने हजर होते. यावेळी सकाळी मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने संप करण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे कंपनीने सुद्धा दोन्ही विभागाच्या गेटवर आपले अतंर्गत सुरक्षा कवच घट्ट करताना बंदुकधारी सुरक्षा रक्षक तसेच बॉऊन्सर तैनात करण्यात आले होते.

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी लक्ष देण्याची जोरदार मागणी

यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष गुणाजी परब (Gunaji Parab) यांनी सदर कंपनीची स्थापना विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Former Chief Minister Pratap Singh Rane) यांनी केली होती, पण कंपनी व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणा मुळे कामगारांवर ही वेळ आली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी सर्व कामगारांच्या वतीने केली आहे.

 ACGL Trade Unions
Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीची बोलणी कोलमडली

2020-21 या वर्षात 23 कोटीचे नुकसान

दरम्यान या संबंधी कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे सी एफ ओ राघवेंद्र बटूला यांनी कंपनीने कामगारांना देऊ केलेल्या पगार वाढीचा विषय सांगितला, त्याच प्रमाणे सदर कामगारांकडून गेल्या काही वर्षांपासून दिलेल्या कामाची पुर्तात होत नाही, त्याच बरोबर बाजारात वाढत चाललेल्या औद्योगिक बस बांधणी विभागातील स्पर्धा आणि त्यात सुट्या भागांची वाढत असलेली दरवाढ त्यामुळे गेल्या वर्षी कंपनीचे 23 कोटी नुकसान झाले आहे, त्यामुळे कामगारांनी मागितलेली पगार वाढ ही रास्त नसल्याने व्यवस्थापन ती पुर्ण करू शकले नाही. त्यामुळे कामगार संघटनेने संप मागे घेऊन कंपनी व्यवस्थापनाला सहकार्य करावे, भविष्यात निश्चित कामगारांना योग्य प्रकारे मोबदला देणार आहे. या संपाच्या काळात दरदिवशी सुमारे तीस लाखांचे नुकसान होणार असल्याचा दावा या वेळी बटुला यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक प्रकाश नाईक, कंपनी व्यवस्थापक दिलीप देसाई उपस्थित होते.

कंपनीचा डाव असफल

या संप काळात कंपनीने कंत्राटदारा मार्फत कामगारांना कामावर घेऊन उत्पादन करण्याची तयारी ठेवली होती, परंतू दोन्ही विभागांत एकही कंत्राटदार किंवा त्यांचे कामगार फिरकले नसल्याने आज पहील्या दिवशी कोणतेही उत्पादन झाले नाही, मात्र कंत्राटदारां मार्फत फक्त साफ सफाई कर्मचारीच आज दोन्ही विभागांत उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com