Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

Shirguppi Ugar Death case: उगार बुद्रुक येथील वकील असणाऱ्या प्रदीप अण्णासाब किरणगी याने आपल्या गल्लीतीलच चैताली अण्णासाहेब माळी हिच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

शिरगुप्पी: गर्भवती पत्नीवर मोटार घालून अपघात भासवून खून करण्यात आल्याची घटना कागवाड तालुक्यात शिरगुप्पी-उगार रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चैताली प्रदीप किरणगी (वय २२, रा. उगार बी. के., ता. कागवाड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रदीप अण्णासाब किरणगी (रा. उगार बी. के.) असे संशयित मारेकरी पतीचे नाव आहे.

याबाबत कागवाड पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक येथील वकील असणाऱ्या प्रदीप अण्णासाब किरणगी याने आपल्या गल्लीतीलच चैताली अण्णासाहेब माळी हिच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

विवाहानंतर पती व सासूकडून तिचा छळ करण्यात येत होता. ती गर्भवती असल्याने रविवारी (ता. ७) पती प्रदीप पत्नी चैताली हिला रुग्णालयात दाखविण्यासाठी शिरगुप्पीकडे दुचाकीवरून घेऊन आला होता. रुग्णालयात दाखवून परत उगार बुद्रुककडे जाताना रस्त्यामध्ये लघुशंकेला जाण्याचे निमित्त करून त्याने दुचाकी थांबविली.

याचवेळी रस्त्याकडेला थांबलेल्या चैतालीला मोटारीने जोराची धडक दिली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला मोटारीतून मिरज येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. या सर्व घटना प्रकरणात चैतालीचे वडील अण्णासाहेब माळी यांना शंका आल्याने त्यांनी कागवाड पोलिसात तक्रार नोंदविली.

Goa Crime News
Tillari Accident: ..तिलारीची सहल ठरली अखेरची! ताबा सुटल्याने टेम्पो-दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

चौकशी केली असता खुनाच्या घटनेला वाचा फुटली. याप्रकरणी चैतालीचे वडील अण्णासाहेब माळी यांनी चैतालीचा पती प्रदीप व सासू भौरव्वा किरणगी आणि मोटारचालकाविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

Goa Crime News
Delivery Death Case: प्रसूतीदरम्यान 41 वर्षीय महिलेचा मृत्यू, निष्काळजीपणाचा ठपका; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल

मोटारचालकाचे नाव समजू शकलेले नाही. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतल्याचे समजते. घटनास्थळी मंगळवारी (ता. ९) अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक रामनगौडा बसरगी, अथणीचे उपाधीक्षक प्रशांत मुन्नोळी, मंडल पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर, कागवाडचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी भेट दिली. कागवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com