गोव्यातील फार्मा कंपनीसाठी मुंबईत मुलाखती; गोमंतकीयांना रोजगारापासून डावलण्याचा प्रकार, सरदेसाईंचा आक्षेप

Interview For Goa Pharma Company: कंपनी स्थानिकांना रोजगाराच्या संधीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
Job Interview
Job InterviewDainik Gomantak
Published on
Updated on

Interview For Goa Pharma Company

गोव्यात निर्माण होणाऱ्या रोजगार संधीसाठी गोमन्तकीयांना प्राधान्य द्यावे अशी मागणी वारंवार स्थानिक आणि राजकीय नेत्यांकडून केली जाते. देशातील एक प्रमुख फार्मा हब म्हणून ओळख असलेल्या गोव्यातील एका फार्मा कंपनीच्या नोकर भरतीसाठी मुंबईत मुलाखती होत आहेत.

यावरुन विजय सरदेसाई यांनी आक्षेप घेतला असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत एक्सवर ट्विट करत याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

गोव्यात असलेल्या इनडोको रेमेडीस या फार्मा कंपनीत विविध पदाच्या नोकरभरतीच्या जागा भरण्यासाठी भोईसर महाराष्ट्र येथे मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून गोमंतकियांना रोजगारापासून डावलण्याचा हा प्रकार आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Job Interview
Goa News: '...तर पाणी पुरवठा बंद करू' जमावाच्या इशाऱ्यानंतर फोंडा पोलिसांकडून मारहाण प्रकरणी रितसर कारवाई

कंपनीच्या चार विविध पदांसाठी येत्या 24 आणि 25 मे रोजी मुलाखती होत आहेत. कंपनी स्थानिकांना या संधीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

तसेच, हा मुद्दा अनेकदा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांनाच गोव्यातील कंपन्यांमध्ये रोजगार दिला जाईल असे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून या कंपनीला जाब विचारून गोमंतकीयांना रोजगार मिळवून देण्यासाठी गोव्यात मुलाखती घेण्याची सक्ती करावी, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fatorda Illegal Casinos
vijai sardesai warns goa govt
Baga beach viral video
Manikrao Thakare, Yuri Alemao
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com