Goa News: '...तर पाणी पुरवठा बंद करू' जमावाच्या इशाऱ्यानंतर फोंडा पोलिसांकडून मारहाण प्रकरणी रितसर कारवाई

Ponda Police: फोंडा पोलिसांनी शांतीनगर - फोंडा येथीलच नागेश जगन्नाथ नाईक (४९) याला अटक केली. ही घटना काल संध्याकाळी ५.१५ वाजता घडली.
Ponda Police Arrested Nagesh Jagannath Naik
Ponda Police Arrested Nagesh Jagannath NaikDainik Gomantak

Ponda Police Arrested Nagesh Jagannath Naik: शांतीनगर - फोंडा येथील पाण्याच्या टाकीवर काम करणाऱ्या गोविंद विष्णू गावकर या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दाग येथील पाणी पुरवठा विभागाशी संबंधित प्लंबरला मारहाण केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी शांतीनगर - फोंडा येथीलच नागेश जगन्नाथ नाईक (४९) याला अटक केली. ही घटना काल संध्याकाळी ५.१५ वाजता घडली.

सरकारी कर्मचाऱ्याला ड्युटीवर असताना मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या दाग - फोंडा येथील इतर कर्मचाऱ्यांसहीत गोविंद गावकर याचा चुलत भाऊ तसेच वाडी - तळावली पंचायतीचे उपसरपंच दिलेश गावकर यांनी संशयिताला त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत फोंडा पोलिस स्थानक गाठले. संशयिताला अटक न झाल्यास पामी पुरवठा बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Ponda Police Arrested Nagesh Jagannath Naik
New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

काल संध्याकाळी गोविंद गावकर हा पाण्याच्या टाकीजवळ आपले काम करीत असताना त्या ठिकाणी नागेश नाईक हा अन्य दोघाजणांना घेऊन तेथे आला आणि त्याने पाणी व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार करीत गोविंद गावकर याला मारहाण केली. हे प्रकरण त्यानंतर दाग - फोंडा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यापर्यंत पोचल्यावर फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली.

दरम्यान, फोंडा पोलिसांनी संशयित नागेश नाईक याला आधीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर रितसर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी संशयित नागेश नाईक याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५३ व ३३२ खाली गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे

Ponda Police Arrested Nagesh Jagannath Naik
Goa News: राज्यातील अनेक भागांमध्‍ये बत्तीगुल, उकाड्यामुळे लोक हैराण; पर्वरी, केपे, पणजीत खेळखंडोबा

दिलेश गावकर (उपसरपंच, वाडी - तळावली)

सरकारी कर्मचाऱ्यावर असा हल्ला करणे योग्य नसून आपली काही तक्रार असल्यास संबंधिताने खात्याच्या वरिष्ठांकडे ती नोंदवायला हवी होती, पण तसे न करता नागेश नाईक याने सरळ गोविंद गावकर याला मारहाण केल्यामुळे हा प्रश्‍न उद्भवला आहे. आज मारहाण केली, उद्या घातक कृत्य करण्यापूर्वीच संशयिताला त्वरित अटक करावी या मागणीसाठी मी स्वतः आणि इतर खात्याचे कर्मचारी फोंडा पोलिस स्थानकात आले होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com