IFFI Goa 2023: 'ही' अभिनेत्री करणार 'इफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन

गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोमवारी रंगणार आहे
Karishma Tanna
Karishma Tanna Dainik Gomantak
Published on
Updated on

Karishma Tanna to Host IFFI Goa 2023 Opening Ceremony: अभिनेत्री करिष्मा तन्ना रविवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. तिला पॅपराझींनी जेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबाबत प्रतिक्रिया विचारली तेव्हा तिने भारत जिंकेल आणि मी गोव्यात जाऊन मॅच पाहणार आहे, असे सांगितले होते.

दरम्यान, क्रिकेटचा महाकुंभ ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आता थांबला असला तरी गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारपासून प्रारंभ होत आहे.

या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोमवारी रंगणार असून अभिनेत्री करिष्मा तन्ना या सोहळ्याचे सूत्र संचालन करणार आहे. या उद्घाटन समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Karishma Tanna
IFFI Goa 2023: गोव्यात 'इफ्फी'मध्ये होणार 13 वर्ल्ड प्रीमियर्स, 18 इंटरनॅशनल प्रीमियर्स; जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

करिष्माने रविवारी मुंबईतून येताना राखाडी रंगाचा लक्षवेधी पोशाख परिधान केला हगोता. तिच्या विशिष्ट फॅशन सेन्समधून तिचे वेगळेपण दिसून येत होते, असे फॅन्सनी म्हटले आहे.

गोव्यात पोहोचल्यावर करिश्मा तन्ना गोव्याच्या वातावरणात मिसळून गेली. गोव्यात आल्यावर तिने, विश्वचषक फायनलसह अशा आनंददायक दिवशी गोव्यात असणे विलक्षण आहे. या आश्चर्यकारक ठिकाणी 54 व्या IFFI चे आयोजन होणार आहे.

आमच्याकडे रोमांचक योजना आहेत आणि काही उल्लेखनीय सिनेमे आहेत. त्यामुळे टचमध्ये राहा, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, 54 व्या IFFI ला सोमवारी 20 नोव्हेंबर रोजी सुरूवात होणार असून 28 नोव्हेंबर महोत्सवाची सांगता होईल.

करिश्मा तन्ना हीला अलीकडेच 'स्कूप' या वेबसीरीजमधील तिच्या भूमिकेमुळे कौतूकाची धनी ठरली होती.

इफ्फी दरवेळी नवीन उंची गाठत आहे. उद्घाटन सोहळा अविस्मरणीय असेल. ग्लॅमर आणि उत्कृष्ट सिनेमा यांच्या फ्युजनसाठी तयार राहा, असेही तिने म्हटले आहे.

Karishma Tanna
Navy Kochi To Goa Race: समुद्रात रंगणार कोची ते गोवा रेसचा थरार; 5 दिवसांत कापणार 667 किमी अंतर

नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरवात प्रसिद्ध ब्रिटीश चित्रपट निर्माते स्टुअर्ट गॅट यांच्या 'कॅचिंग डस्ट' या चित्रपटाने होणार आहे.

फ्रेंच चित्रपट निर्माते नुरी बिल्गे सिलान यांनी दिग्दर्शित केलेला 'अबाउट ड्राय ग्रासेस' हा फेस्टिव्हलच्या मध्यावरचा चित्रपट असेल आणि रॉबर्ट कोलोड्नी दिग्दर्शित 'द फेदरवेट' हा समारोपाचा चित्रपट असेल.

याशिवाय हॉलिवूड अभिनेता-निर्माता मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com