Konkan Railway: गोव्यात करा ख्रिसमस, न्यू ईयरचे सेलिब्रेशन; कोकण रेल्वेतर्फे धावणार विशेष रेल्वेगाड्या

22 डिसेंबर ते 02 जानेवारी या काळात या रेल्वेगाड्या असणार आहेत
Konkan Railway Trains
Konkan Railway Trains Dainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway: गोव्यात ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अनेकांना या काळात गोव्यात यावेसे वाटते. कोकण रेल्वेने आता या काळात विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे ठरवले आहे.

त्यानुसार येत्या 22 डिसेंबर ते 02 जानेवारी या काळात या विशेष रेल्वेगाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्ष गोव्यात साजरे करू इच्छिणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने ही सुसंधी उपलब्ध केली आहे.

ख्रिसमस स्पेशल या गाड्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि आणि पनवेल ते करमाळी या स्थानकादरम्यान धावणार आहेत.

Konkan Railway Trains
Navy Kochi To Goa Race: समुद्रात रंगणार कोची ते गोवा रेसचा थरार; 5 दिवसांत कापणार 667 किमी अंतर

सीएसएमटी ते करमाळी (02051) ही स्पेशल गाडी 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी 2 वाजता गोव्यातील थिवी येथे पोहोचेल.

तर थिवी- सीएसएमटी (01152) ही विशेष दैनिक गाडी थिवी येथून 22 डिसेंबर ते 02 जानेवारी दरम्यान दररोज दुपारी 3 वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

पुणे जंक्शन- करमाळी (01445) विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून 22 आणि 29 जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता करमाळीला पोहोचेल.

करमाळी - पुणे जंक्शन (01446) विशेष (साप्ताहिक) 24 आणि 31 डिसेंबर रोजी करमाळी येथून सकाळी 9:20 वाजता सुटेल. ही ट्रेन रात्री 11:35 वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल.

Konkan Railway Trains
Nilesh Cabral: गोव्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसेच नाहीत! केंद्र सरकार मदत करेल असे वाटले होते...

ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकांवर थांबेल.

पनवेल - करमाळी ही विशेष गाडी 23 आणि 30 डिसेंबर रोजी पनवेल येथून रात्री 10 वाजता सुटेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वा. ही रेल्वेगाडी करमाळीला पोहोचणार असून, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा स्थानकावर थांबणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com