ध्येय गाठण्‍यासाठी कठोर परिश्रम हवेच : प्रतापसिंह राणे

पर्ये भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
Pratapsingh Rane
Pratapsingh RaneDainik Gomantak
Published on
Updated on

विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस बनून समाजात आपला नावलौकिक करावा. आयुष्यात कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात. कोणतेही संकट आले तरी डगमगून न जाता त्‍यास सामोरे जा. अपयशाने खचून जाऊ नका. पुन्‍हा कठोर परिश्रम करा. यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन माजी मुख्‍यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी केले.

Pratapsingh Rane
CM Pramod Sawant : म्हणून शिगमाही मूळ जागी पोहोचला : मुख्यमंत्री

पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे बोलत होते.

व्यासपीठावर पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष वामन बापट, विद्यालयाचे प्राचार्य यशवंत सावंत, उपप्राचार्य रावसाहेब राणे, संस्थेचे सचिव कुष्ठा राणे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक शिवाजीराव राणे सरदेसाई, भूमिका प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद वळवईकर आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती.

अकरावी विज्ञान शाखेची सुकन्या ननावरे व बारावी कला शाखेची भूमिका राजकुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. यशवंत सावंत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनीता गावकर यांनी केले तर विद्यार्थी मंडळाचे सरचिटणीस संजय माळी यांनी आभार मानले.

Pratapsingh Rane
हिंदू धर्म समर्थ, विधवा प्रथेबाबतच्या खासगी ठरावावर बजरंग दलाचे फळदेसाई यांची टीका

उत्‍कृष्‍ट विद्यार्थी, खेळाडू सन्‍मानित

उत्कृष्ट विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात कला शाखेतील भूमिका राजकुमार, वाणिज्य शाखेतील वेदांत जोशी, विज्ञान शाखेतील सिंथिया गावडे, व्यावसायिक शाखेतील स्नेहित पानीकर यांचा समावेश होता.

तसेच उत्कृष्ठ खेळाडू उद्देश माजिक, प्रांजल गावकर, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक संजय माळी यांचाही सन्मान करण्यात आला. वामन बापट यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com