हिंदू धर्म समर्थ, विधवा प्रथेबाबतच्या खासगी ठरावावर बजरंग दलाचे फळदेसाई यांची टीका

विधवा प्रथा बंद करणे बाबत विधानसभेत खाजगी ठराव मांडणार आहेत. त्याच्यावर फळदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली‌ आहे.
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

हिंदू धर्मांच्या परंपरांमध्ये काय बदल घडवायचे आहेत, ते घडवण्यासाठी आपला सनातन धर्म समर्थ आहे, त्यासाठी युरी आलेमाव यांची गरज नसल्याचे राष्ट्रीय बजरंग दल गोवा विभागाचे प्रमुख नितीन फळदेसाई यांनी आज येथे सांगितले.

विधवा प्रथा बंद करणे बाबत विधानसभेत खाजगी ठराव मांडणार आहेत. त्याच्यावर फळदेसाई यांनी सदर प्रतिक्रिया दिली‌.

हिंदू धर्मातील प्रथा परंपराबाबत एवढे सतर्क आणि जागरूक असलेले युरी आलेमाव हे हिजाब आणि बुरख्याबद्दल एवढ्याच पोटतिडकीने बोलतील का? असा सवालही फळदेसाई यांनी केला.

विधवा प्रथा बंद करायच्या की नाही हे ठरवण्यास हिंदू धर्मातील सोडून बाहेरची मंडळी हस्तक्षेप करणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करून आपल्या धर्मांत काय चालले आहे, तेथे काही सुधारणा आवश्यक असल्यास लक्ष द्यावे

गोव्यात अनेक ठिकाणी हिंदू मंदीराच्या जागेवर चर्च अन्याय करत असल्याच्या अनेक घटना सद्या सुरू आहेत, त्याबद्दल ब्र न काढणारे युरी आलेमाव एकदम विधवा प्रथेवर आले. आधी हिंदू धर्माचा अभ्यास आलेमाव यांनी करावा. असे फळदेसाई म्हणाले.

Yuri Alemao
Panaji Traffic Video: 'अटल सेतू' बंदचा प्रवाशांना फटका, तब्बल चार तास वाहतूक ठप्प

दरम्यान दिल्लीत सी आर झेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात येणाऱ्या बंगल्याच्या विरोधात दिल्लीत जंतरमंतर येथे निदर्शने करणारी मंडळी गोव्यातील अन्य ठिकाणी मंदिराच्या जागा बळकावणऱ्यांच्या बाबतीतही अशी निदर्शने करायला हवीत, असे मत राष्ट्रीय बजरंग दल गोवा विभागाचे प्रमुख नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केले.

स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीत पिकनिकला जाऊन निदर्शनांच्या नाटकांची गरज नाही. सिआरझेडचे उल्लंघन करणारे ते एकमेव प्रकरण आहे का? अन्य प्रकरणाबाबत हे लोक का बोलत नाहीत? असा सवाल फळदेसाई यांनी केला.

आम आदमी पक्ष हा एक राजकीय पक्ष आहे, असे एक प्रकरण घेऊन दिल्लीत निदर्शने करण्यापेक्षा इथल्याच सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करण्याची गरज असताना दिल्लीत नौटंकी कशाला? असे फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com