CM Pramod Sawant : म्हणून शिगमाही मूळ जागी पोहोचला : मुख्यमंत्री

सांस्कृतिक संग्रहालयाची संकल्पना विचाराधीन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

आमदार दिगंबर कामत आपल्या मूळ पक्षात परतल्यानेच मडगावचा शिगमाही आपल्या पारंपरिक व मूळ स्थानी पोहोचला, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात काढले. ते मडगाव शिगमोत्सव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नावेलीतही कमळ फुलले, आता दामू यांना परत एकदा फातोर्डात निवडून आणले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सासष्टी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. मडगावमधील दिंडी खास आहे. या तालुक्यात शिगम्याबरोबर कार्निव्हलही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. अशा प्रकारचे उत्सव साजरे केल्यानेच सर्व समाज एकत्रित येतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांनी शिगमोत्सवात सहभागी झालेल्या कलापथकांसह चित्ररथ तयार करणाऱ्या कलाकारांचेही अभिनंदन केले. दामू नाईक यांनी मडगाव शिगमोत्सवाची पार्श्र्वभूमी सांगितली.

गोव्यात सांस्कृतिक पर्यटनाला वाव देण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्यातील एक म्हणजे सांस्कृतिक संग्रहालयाची आहे. संग्रहालयात गोव्याच्या पारंपरिक, प्रथा, संस्कृतीचे प्रदर्शन पर्यटकांनाही अनुभवता येईल. संग्रहालयाची संकल्पना पर्यटन तसेच कला व संस्कृती संचालनालयातर्फे प्रत्यक्षात आणली जाईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com