IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसारभारतीने दिली 'ही' खास सुविधा..

Goa IFFI 2024: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला आणि सिनेरसिक ज्या महोत्सवाची चातकासारखी वाट पाहतात तो इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या 20 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतोय.
IFFI Live Streaming, IFFI events, Iffi venue, IFFI OTT Platform
IFFI Dainik Gomantak
Published on
Updated on

International Film Festival 2024 Live Stream Updates

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला आणि सिनेरसिक ज्या महोत्सवाची चातकासारखी वाट पाहतात तो इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या 20 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतोय. यंदाचा हा 55 वा चित्रपट महोत्सव 28 तारखेपर्यंत चालणार आहे.

तुम्हीही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर जरुर महोत्सवाला हजेरी लावा. परंतु तुम्हाला गोव्याला जाणं जमत नसेल तर नाराज होण्याची काही एक गरज नाहीये. महोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमींग होणार आहे. तुम्ही घरबसल्या प्रसार भारतीवर हा महोत्सव पाहू शकता.

एवढचं नाहीतर तुमच्यााठी प्रसार भारतीने खास पेशकश केली आहे. प्रसार भारती नवीन प्लॅटफॉर्मसह ओव्हर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी हे लॉन्च होणार आहे. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत हे विनामूल्य असणार आहे. यासंबंधीची माहिती बुधवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली.

IFFI Live Streaming, IFFI events, Iffi venue, IFFI OTT Platform
IFFI 2024: 'इफ्फी'ची विक्रमी नोंदणीकडे वाटचाल! अनुपम खेर घेणार 'मास्टर क्लास'; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ने उघडणार पडदा

जाजू यांनी हैदराबादमधील 16 व्या इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स (IGDC) मध्ये ही घोषणा केली, जिथे ते प्रसार भारतीच्या डिजिटल भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी मीडिया राऊंडटेबलमध्ये सहभागी झाले होते.

यावर्षीच्या इफ्फीमध्ये 15 जागतिक, 40 आशियाई प्रीमियर तसेच106 भारतीय प्रीमियर्ससह 180 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जातील. यामध्ये जवळपास 81 देशांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा समावेश आहे. सिनेरसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे.

IFFI Live Streaming, IFFI events, Iffi venue, IFFI OTT Platform
IFFI 2023: फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न! 'इफ्फी'त हॉलीवूडस्टार मायकल डग्लसकडून अश्लील कॉमेंट्स...

इफ्फीतील महत्वाच्या गोल्डन पीकॉक अवॉर्डसाठी 15 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फिक्शन फिचर फिल्म्स स्पर्धा करतील. यामध्ये 12 सिनेमे परदेशी आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, चीन या महत्वाच्या देशांमधील सिनेमे यात समाविष्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com