IFFI 2023: फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न! 'इफ्फी'त हॉलीवूडस्टार मायकल डग्लसकडून अश्लील कॉमेंट्स...

मास्टरक्लास संवाद सत्रावर प्रेक्षकांची तीव्र नाराजी
Michael Douglas at IFFI 2023
Michael Douglas at IFFI 2023 Dainik Gomantak

Michael Douglas at IFFI 2023: फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न हे शब्द पाश्चिमात्य जगतात जितके सहज वापरले जातात तितके अद्याप भारतीय जनमानसात सार्वजनिकरित्या वापरले जात नाहीत.

तथापि, मंगळवारी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) च्या मंचावर हॉलीवूड स्टार मायकल डग्लस यांच्याकडून मात्र सार्वजनिक संवाद सत्रात अशा शब्दांचा सर्रास वापर झाला. या अश्लील कॉमेंट्समुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मायकल डग्लस यांना यंदाच्या इफ्फीमध्ये सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने मंगळवारी सायंकाळी समारोप सोहळ्यात गौरविण्यात आले.

तत्पुर्वी मंगळवारी दुपारी इफ्फीच्या मास्टरक्लास या उप्रकमात इन कॉन्व्हर्सेशनमध्ये भारतीय चित्रपट निर्माते शैलेंद्र सिंग यांनी मायकल डग्लस यांच्याशी संवाद साधला. यात हा प्रकार घडला. होस्ट शैलेंद्र सिंग आणि मायकल दोघांकडून खुलेआम अश्लिल शब्दांचा वापर केला गेला.

Michael Douglas at IFFI 2023
IFFI 2023: मी मुलीसोबत आलोय, कॉलगर्ल सोबत नाही; 'इफ्फी'मध्ये अभिनेते रणजीत यांनी सांगितला किस्सा...

असे झाला संवाद

इफ्फीच्या मास्टरक्लासमध्ये इज इट टाईम फॉर वन वर्ल्ड सिनेमा? या विषयावर भारतीय चित्रपट निर्माते शैलेंद्र सिंग यांनी मायकल डग्लस यांना बोलते केले. दरम्यान, मायकल डग्लस हे भारतात आल्यापासून शैलेंद्र सिंग त्यांच्यासोबत होते.

त्यावरून तसेच मायकल डग्लस यांच्या इंटिमेट चित्रपटांच्या संदर्भाने शैलैंद्र सिंग यांनी डग्लस यांना “आम्ही केलेला हा सर्वाधिक लांबीचा फोरप्ले आहे. लवकरच, आपण एकत्र क्लायमॅक्स केला पाहिजे,” अशी कॉमेंट केली. त्यावर "मी पॉर्न करत नाही!" असे प्रत्युत्तर डग्लस यांनी दिले.

80 वर्षांच्या डग्लस यांना सिंग यांनी आरआरआर मधील 'नाटू नाटू' गाण्यावर डान्सही करायला लावला. दरम्यान, डग्लस यांची चित्रपट कारकिर्द ते त्यांची कॅन्सरशी लढाई अशा विषयांवर सिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला. काही हलके-फुलके, मजेशीर प्रश्नही त्यांनी विचारले.

डग्लस यांची पत्नी अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स यांच्याविषयी डग्लस यांना अनेक प्रश्न विचारले गेले, जसे की त्यांच्या सँडलचा नंबर किती आहे? आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला शिक्षा म्हणून डग्लस यांना फुलांचा हार घातला जात होता.

Michael Douglas at IFFI 2023
IFFI 2023: करन जोहर पहिल्या रांगेत कसा?; 'इफ्फी'चा बॉलीवूड तमाशा करून टाकला...; आयोजकांवर ज्युरी भडकले

प्रेक्षकांचा संताप

दरम्यान, मुलाखतीतील अश्लील टिपण्ण्यांवर उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. अनेक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम मास्टरक्लास सारखा नव्हता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंग हे स्वतःबदल्लच अधिक बोलत होते, त्यांचे प्रश्न विचित्र होते, प्रेक्षकांना प्रश्न विचारण्याची संधी द्यायला हवी होती, डग्लस यांना अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे, त्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्यायला हवी होती, हा शैलेंद्र सिंग यांचा एकपात्री प्रयोग होता, अशा प्रतिक्रिया संतप्त प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, मायकल डग्लस यांचा 'बेसिक इन्स्टिंक्ट' हा चित्रपट हॉलीवूडच्या चित्रपट इतिहासातील सर्वाधिक सेक्सी चित्रपट मानला जात होता.

अलीकडच्या काळातच या चित्रपटाची ही ओळख मागे पडली आहे. अनेक वर्षे सर्वाधिक सेक्सी अशी ओळख या चित्रपटाला चिकटली होती. तसेच ओरल सेक्समुळे डग्लस यांना कॅन्सर झाला होता, अशीही चर्चा पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये अनेक वर्षे होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com