Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी घेतले श्रींचे दर्शन

Goa: सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

कोविड महामारीनंतर प्रथमच गोमंतकीय सावरले असून यंदा गणेशोत्सवातून प्रतीत होणारा गोमंतकीयांचा उत्साह हा त्याचेच प्रतीक आहे. गणराया सर्वांना सुखसमृद्धी देवो, अशा सदिच्छा मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केल्या.

महालक्ष्मी-बांदोडा येथे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, ढवळीकर ट्रस्टचे दिलीप ढवळीकर, मिथिल ढवळीकर तसेच मान्यवर उपस्थित होते. ढवळीकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे स्वागत केले. नंतर मुख्यमंत्र्यांनी आडपई येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि गणपतीचे दर्शन घेतले.

Pramod Sawant
Goa School: शाळा विलिनीकरणासंदर्भात पालक, शिक्षकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ; CM सावंत

त्यानंतर ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, कोविड महामारी अजून संपलेली नाही, तरीपण भाविकांनी आवश्‍यक खबरदारी घेण्याची गरज आहे.

Pramod Sawant
राज्यभरात आज पाच दिवसांच्या गणरायाला भक्तीभावाने निरोप

मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्या घरी पाच दिवसांचा गणेशोत्सव असल्याने मडकईवासीय तसेच मगो कार्यकर्ते व मगोप्रेमी नागरिकांची गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रिघ लागली होती. भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन ढवळीकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. दोन वर्षांनंतर प्रथमच यंदा मोठी गर्दी पाहायला मिळाली, असे उद्गार ढवळीकर कुटुंबीयांनी काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com