पणजी: कमी पटसंख्येचे कारण देत राज्यातील 245 एकशिक्षकी सरकारी शाळांच्या विलिनीकरणाचा सरकारने घाट घातला होता. त्याला सामाजिक पातळीवरून तीव्र विरोध होऊ लागला आहे. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देत, भाऊसाहेबांनी गोव्यात गावोगावी शाळा सुरू केल्य. शिक्षणाचा पाया भक्कम केला. शाळा विलिनीकरणासंदर्भात अजून अंतिम निर्णय नाही असे विधान मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांनी केले. या दरम्यान, पालक, शिक्षकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ असा विश्वास देखील त्यांनी दिला.
(No final decision regarding school merger yet statement by cm pramod sawant)
गावागावांतून उत्स्फूर्तपणे पालकांच्या बैठका होत असून, मराठीप्रेमी नेतेही जनआंदोलनाची रूपरेषा आखत आहेत. राजकीय पक्षांसह ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे उमेदवारही सरकारी शाळा वाचविण्यासाठी उघड पाठिंबा देत आहेत. परिणामी सरकारला निर्णयाप्रती पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार राज्यातील भाषाप्रेमी नेत्यांनी व्यक्त केला आहे. भाग शिक्षणाधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींवरही पालकांचा दबाव वाढला आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, ‘आप’ आदी राजकीय पक्षांनीही शाळा विलिनीकरणाला विरोध दर्शविला आहे. सत्तरी, पेडणे, डिचोली, फोंडा, धारबांदोडा, सांगे, काणकोणसह अन्य तालुक्यांतीलही पालक आक्रमक झाले अाहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.