IIT: सांगे नाहीतर मग कोठे होणार IIT? काय म्हणाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सांगेत आयआयटी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
Goa Chief Minister Pramod Sawant
Goa Chief Minister Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षण खात्याचे अप्पर सचिव कविता चौहान यांनी सांगे येथील जमीन IIT प्रकल्पासाठी योग्य नसल्याचे पत्र या शेतकऱ्यांना पाठवले आहे. यावरून सांगेत आयआयटी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सांगे नाहीतर मग कोठे होणार IIT प्रकल्प हा प्रश्न सध्या गोव्यातील नागरिकांना पडला आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी IIT प्रकल्पाबाबत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Goa Chief Minister Pramod Sawant
Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुन यांचे गोव्यात अवैध बांधकाम; पंचायतीने दिली नोटीस

आयआयटीसाठी नवी जागा शोधण्याचे काम सुरू केले असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. पण, आयआयटीची नवी जागा सांगेत असणार की इतर दुसऱ्या ठिकाणी यावर भाष्य करणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. त्यामुळे गोव्यातील आयआयटी प्रकल्प कोठे होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. पण, आयआयटीचा प्रकल्प गोव्यातच होणार याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी शाश्वती दिली आहे.

Goa Chief Minister Pramod Sawant
Goa Corona Update: गोव्यात एक डझन सक्रिय कोरोना रूग्ण, केंद्राचा सतर्कतेचा इशारा

गेल्या अनेक वर्षांपासून आयआयटी गोवासाठी कायमस्वरूपी स्थळ शोधण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सांगे, काणकोण, वाळपई आणि पुन्हा सांगे असा प्रवास करणाऱ्या या शिक्षण प्रकल्पासाठी सांगे तालुक्यातील कोटार्ली परिसरातील जमीन राज्य सरकारने स्थानिकांचा विरोध डावलून सीमांकीत करीत तसा अहवाल केंद्राकडे पाठवला होता. याला या भागातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करत आमरण उपोषण चालू ठेवले होते. यासंबंधी नागरिक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार सुरू होते.

दरम्यान, याबाबतच स्थानिक कार्यकर्ते कोंतान्सियो मास्करेन्हास आणि इतरांनी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाला जमिनीसंदर्भात विचारणा केली होती. यावर शिक्षण खात्याचे अप्पर सचिव कविता चौहान यांनी यासंदर्भातील माहिती देत राज्य सरकारकडून विचारात असलेली आणि सीमांकन करून अहवाल सादर झालेली जमीन या प्रकल्पासाठी योग्य नसल्याचे पत्र या शेतकऱ्यांना पाठवले आहे. यावरून सांगेत आयआयटी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
IIT Project In Katamgaldada
Goa Crop Loss Compensation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com