Goa Corona Update: गोव्यात एक डझन सक्रिय कोरोना रूग्ण, केंद्राचा सतर्कतेचा इशारा

केंद्राचा राज्यांना सतर्कतेचा इशारा
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Update: गोव्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा जोर ओसरला आहे. मागील वीस दिवसांत केवळ 1 किंवा 2 नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद होत आहे. तर, चार वेळा एकही नवीन कोरोना रूग्णांची वाढ झाली नाही. नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या घटल्याने सक्रिय राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मंगळवारी (दि.20) राज्यात एका नव्या रूग्णांची वाढ झाली असून, एकाला डिस्चार्ज देण्यात आला. सध्याच्या घडीला गोव्यात केवळ एक डझन सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Goa Corona Update
Serendipity Art Festival: युनिक, ऑफबीट, क्रिएटीव्ह; मन प्रसन्न करणारे सेरेंडिपिटीचे खास फोटो

गोवा आरोग्य विभागाने (Goa Health Department) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्याच्या घडीला केवळ 12 कोरोनाबाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 2 लाख 59 हजार 059 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 55 हजार 034 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर 4,013 जणांचा  कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.45 टक्के एवढा झाला आहे.

Goa Corona Update
Elon Musk: मोठी बातमी! इलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा

केंद्राचा राज्यांना सतर्कतेचा इशारा

जपान, अमेरिका, चीन, कोरिया आणि ब्राझिलमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोविड-19 व्हेरिएंट शोधण्यासाठी जिनोम सिक्वेन्स चाचण्या वाढवण्याचे निर्देश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com