PM Oath Ceremony: मोदींच्या शपथविधीला मुख्यमंत्री सावंतांना अंबानींच्या मागे स्थान; पणजीकर म्हणाले, ‘हा तर गोव्याचा अपमान’

Amarnath Panajikar Criticized Chief Minister Pramod Sawant: काँग्रेसचे मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला.
Amarnath Panajikar Criticized Chief Minister Pramod Sawant
Amarnath Panajikar Criticized Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

Amarnath Panajikar Criticized Chief Minister Pramod Sawant: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींच्या या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशांचे प्रमुख, देशातील प्रसिद्ध उद्योगपतींसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. याचदरम्यान एक दृश्य पाहायला मिळाले. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि मोदींचे मित्र मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाच्या मागे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बसल्याचे दिसले. यावरुनच आता काँग्रेसचे मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा समाचार घेतला.

भारताच्या 13व्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे क्रोनी कॅपिटलिस्ट मित्र अंबानी कुटुंबाच्या मागे बसलेले पाहणे धक्कादायक आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याची मान शरमेने खाली घातली, असा आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Amarnath Panajikar Criticized Chief Minister Pramod Sawant
CM Pramod Sawant: दिल्ली गाजवलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना बढती मिळणार? त्यांनीच दिली एक्सक्लूसिव्ह माहिती video

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शपथविधी सोहळ्यावेळी मुकेश अंबानी आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या मागे बसलेले दाखवणाऱ्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस मीडिया सेलच्या अध्यक्षांनी शिष्टाचार न पाळल्याबद्दल भाजपवर टीका केली.

मुख्यमंत्री सावंत यांनी शपथविधी सोहळ्याला "मोदींच्या हातचे बाहूले" म्हणून हजेरी लावल्यासारखे दिसते. त्यांनी गोव्याच्या (Goa) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असता आणि "मोदी-शहांच्या इशाऱ्यावर ताल धरला असता तर ते तसे करण्यास ते मोकळे होते. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेचा अनादर करण्याचा अधिकार नाही, असेही पणजीकर पुढे म्हणाले.

Amarnath Panajikar Criticized Chief Minister Pramod Sawant
Pramod Sawant: फर्क साफ है! CM सावंत यांनी सांगितला आयआयटीयन पर्रीकर आणि केजरीवाल यांच्यातील फरक

भाजपचे केंद्रीय नेतृत्व गोव्यातील भाजप (BJP) नेत्यांना गुलामाप्रमाणे वागवत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी गोव्यातील बहुजन समाजाला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. त्यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबरीने ज्येष्ठ मंत्री असतानाही श्रीपाद नाईक यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री करण्यात आल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा अनादर करुन गोमंतकीयांचा अपमान करणाऱ्या मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या दिल्लीतील कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याबद्दल भाजपने गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणीही पणजीकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com