Goa Eco Sensitive Zone: गावे वगळण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांची धडपड! केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची घेतली भेट; पाहणी दौऱ्यासाठी पथक दाखल

CM efforts to exclude villages, meets central environment minister: केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या मसुदा अधिसूचनेतील १०८ गावांच्या यादीतून २१ गावे वगळण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेतली.
CM Pramod Sawant, Bhupendra Yadav
CM Pramod Sawant, Bhupendra Yadav Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Eco Sensitive Zone

पणजी: केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या मसुदा अधिसूचनेतील १०८ गावांच्या यादीतून २१ गावे वगळण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या गावांच्या पाहणीसाठी उद्या (ता. २६) केंद्रीय पथक राज्याच्या भेटीवर येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सादर केलेल्या प्रस्तावाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही अशी भूमिका राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी घेतली आहे.

विशेष म्हणजे सिक्वेरा यांनीच दिल्लीत याआधी झालेल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांनीच केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना गोव्याने सादर केलेल्या दाव्याची पृष्टी करण्यासाठी राज्याच्या पाहणी दौऱ्यावर पथक पाठवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार असे निश्चित करण्यात आले होते.

CM Pramod Sawant, Bhupendra Yadav
Tanvi Vast Arrest: हेल्पर नव्हे ही तर भामटीच! गोव्यात वृद्धांना फसवणाऱ्या तन्वीला अटक

केंद्रीय पथक गोव्यात येणार असल्याने या पथकाच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी आज सचिवालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्राला कोणता प्रस्ताव सादर केला आहे याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, असे सिक्वेरा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच केंद्रीय मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेतून २१ गावे वगळण्याची मागणी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून केली होती.

त्या पत्राच्या आधारे दिल्लीत घेतलेल्या बैठकीला सिक्‍वेरा उपस्थित होते. पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र समिती उद्या (ता. २६) राज्यात पोचणार आहे. समितीचे सदस्य २७ नोव्हेंबर रोजी गोवा सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, गावांच्या वगळणीसंबंधीच्या मुद्यांवर विचारविनिमय करणार आहेत. त्यानंतर राज्य सरकारने नियोजन केल्यानुसार गावांना भेटी देण्यासाठी सदस्य दौऱ्यावर जातील.

या समितीत डॉ. संजय कुमार (अध्यक्ष), प्रा. रमण सुकुमार (सदस्य), पी. के. गजभिये (सदस्य), डॉ. आर. पी. सिंग (सदस्य), डॉ. सतीश सी. गारकोटी (सदस्य), डॉ. हितेंद्र पाडल्या (सदस्य), डॉ. एस. केर्केट्टा (सल्लागार/शास्त्रज्ञ ‘जी’, सदस्य-संयोजक), डॉ. डब्ल्यू. भारत सिंग (शास्त्रज्ञ ‘एफ’), डॉ. रितेश जोशी (शास्त्रज्ञ ‘एफ’) व अनिल ठाकूर (सल्लागार) यांचा समावेश आहे.

CM Pramod Sawant, Bhupendra Yadav
Teja Sajja At IFFI: 'सुपरस्टार चिरंजीवी माझ्यासाठी पितृतुल्य'! Hanuman Fame अभिनेत्याने दिला चांगला चित्रपट बनवण्याचा कानमंत्र

वगळली जाणारी २१ गावे

सत्तरी : अन्सुली, भिरोंडा, भुईपाल, खोडये, खडकी, खोतोडे, कुंभारखण, पणशे, केरी, सातोडे, शिरोली व वेळूस

धारबांदोडा : कामरखण, म्हैसाळ, धारबांदोडा, सांगोड आणि पिळये

सांगे : कोळंब, रिवण, रुमरे

काणकोण : खोला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com