कालच्या सभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पुन्हा महिलांवर बोलतांना जीभ घसरली. तृणमूल काँग्रेस हा गोव्याबाहेरील पक्ष आहे तर त्यांनी स्वतः त्यांचे पूर्वज कोठले, हे अगोदर लोकांना सांगावे. भाजप हा गोव्यातील पक्ष आहे का? तृणमूल काँग्रेस (TMC) देशाबाहेरील पक्ष आहे का? ममता दीदी यांच्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांच्या मंत्र्यांनी महिलेवर अत्याचार केले आहेत हे विसरू नयेत. मगोचे (MGP) नेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी अशी टीका पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते प्रचारात अनेक आश्वासने देतील, मात्र या आश्वासनांना जनतेने भुलून जाऊ नये. गेली दहा वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. केंद्रात व राज्यात भाजप (BJP) सरकार असतानाही तो त्यांना का सुरू करता आला नाही, असा प्रश्न मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केला. या सरकारला खाण व्यवसाय सुरू करायचा नाही व भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास तो आणखी दहा वर्षे तरी शक्य नाही, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.