Power Shutdown in South Goa : दक्षिण गोव्यातील वीज विभागाने 21 मेला वार्षिक वीजपुरवठा बंद केल्याचा परिणाम इंटरनेटसह इतर दैनंदिन सुविधांवर झाला आहे. यामुळे सासष्टी तालुक्यातील नियमित वीजपुरवठाही अनियमित झाला आहे.
शेल्डे येथे वीजपुरवठा बंद झाल्यापासून, कुंकळ्ळी आणि वेळ्ळी येथील पॉवर स्टेशन, जे सासष्टीला वीज पुरवठा करतात तिथेही समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे दिवसातील बरेच तास वीज खंडित होते आणि दिवसभर हे चक्र सुरूच राहते.
दक्षिण गोव्यात वीजपुरवठा खंडित होण्याचा अजून एक परिणाम म्हणजे, कोलवा ते केळशीपर्यंतच्या परिसरात Gwave ही सरकारी अनुदानीत इंटरनेट सेवा कार्यरत असून ही इंटरनेट कनेक्टिव्हिटी गुरुवारपासून बंद आहे.
GWave चे महाव्यवस्थापक वाय. एस. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज विभागातर्फे करण्यात आलेल्या दुरुस्ती आणि नवीन वीज केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे GWave यांची फायबर केबल आठ ठिकाणी कापली गेली आहे, यामुळे संबंधित परिसरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित झाली.
या समस्येबाबत वीज अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. शनिवारी सासष्टीतील बहुतेक किनारी गावांमध्ये सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यानंतर पुन्हा आणखी दोन तास पुरवठा ठप्प होता. अशा प्रकारच्या घटना पूर्ण राज्यभरात होत असल्याने नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.