Goa Congress: ‘भाजपा’कडून सामान्यांकडे दुर्लक्ष

संजय निरूपम ः विकास योजना राबविण्यात नऊ वर्षे सपशेल अपयश
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी भाजप सरकारवर नऊ प्रश्नांचे अस्त्र सोडत भाजपा सरकारवर खरमरीत टीका केली. भाजप सरकार हे सूडाचे राजकारण करत सर्वसामान्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

विकास योजना राबविण्यात, गरीबी, राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्ट्राचार, महागाई हे विषय हाताळण्यात गेली 9 वर्षे सपशेल अपयशी ठरले आहे.

यावेळी युरी आलेमाव, गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लोस फेरेरा आणि कॅप्टन विरीआतो फेर्नांडिस उपस्थित होते. यावेळी एका पुस्तिकेचेही संजय निरुपम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Goa Congress
PM Narendra Modi: नीती आयोगाच्या बैठकीत ‘स्वयंपूर्ण’ गोव्याचाही मुद्दा

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निरुपम म्हणाले, भाजप आज ९ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असला तरी भारतातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याने आनंद साजरा करण्यासारखे काहीच नाही.

पंतप्रधान मोदी यांनी दिलेली मोठमोठी आश्वासने आजतागायत पूर्ण झालेली नाहीत. काँग्रेस पक्ष त्यांना ९ प्रमुख प्रश्न विचारू इच्छितो ज्यावर भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

भाजप सरकारच्या काळात दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत, असेही निरूपम म्हणाले.

Goa Congress
Mopa International Airport: ‘टॅक्सी स्टॅण्ड’चा प्रश्नी महत्वाची बातमी! टॅक्सी स्टँडबाबत मुख्यमंत्र्यांनी...

भांडवलदारांचे सरकार

भाजप सरकारने कोविड-19 साथीच्या आजाराचे पूर्णपणे चुकीचे व्यवस्थापन केले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कोविडमध्ये 47 लाख लोकांचा मृत्यू झाला.

स्थलांतरित कामगारांचे मोठ्या प्रमाणात निर्गमन झाले आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. भाजप सरकार सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी नसून ते भांडवलदार आणि श्रीमंत लोकांसाठी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com