Porvorim News : पर्वरीचा पाणीपुरवठा दोन दिवसांत करणार सुरळीत

सहाय्यक अभियंता रायकर यांनी व्‍यक्त केला विश्‍‍वास; तांत्रिक अडचणी
Water Shortage Problem mandrem
Water Shortage Problem mandremDainik Gomantak
Published on
Updated on

मागील 20 दिवसांपासून पर्वरीच्‍या काही भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत साहाय्यक अभियंते रायकर यांच्याकडे विचारणा केली असता, पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.

पर्वरीत लोकसंख्या वाढत असून, पाण्याची मागणीही वाढत आहे. सध्या असलेली व्यवस्था ही मागणी पुरवण्यास सक्षम नसल्याने आमदार रोहन खंवटे यांनी पर्वरी भागासाठी एक प्रकल्प सुरू केला होता.

Water Shortage Problem mandrem
Valpoi News : मासोर्डेत वाहतेय औषधीयुक्त झर! त्वचारोगांवर रामबाण उपाय

परंतु या प्रकल्पास कच्च्या पाण्याचा पुरवठा करणारी तिळारी धरणावरील जलवाहिनी फुटली होती. ती दुरुस्त करण्यास पाच दिवस लागणार होते. परंतु त्‍याचवेळी अस्‍नोडा येथे मोठी जलवाहिनी फुटल्याने व काही तांत्रिक अडचणी आल्याने हे काम ठराविक वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

ज सदर जलवाहिनीतून व्यवस्थित पाणी आले. त्‍यामुळे येत्या दोन दिवसांत पर्वरीत सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्‍याचे रायकर यांनी सांगितले.

Water Shortage Problem mandrem
Vasco Crime News : ‘त्या’ नराधम पित्याचा पोलिसांना सतत गुंगारा

सध्‍या 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा

पर्वरीतील शांतीनगर, पत्रकार कॉलनी, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, पोलिस कॉलनी, संजयनगर, पीडीए कॉलनी, कदंब डेपो व सभोवतालच्या भागातील लोक गुरुवारीही पाण्‍यासाठी वणवण फिरताना दिसले.

पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयातही अनेक तक्रारदार उभे असल्याचे दिसून आले. सरकारी खात्याचा एक व कंत्राटावर घेतलेले चार मिळून एकूण पाच टँकरनी सध्या पर्वरी भागात पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com