Vasco Crime News : ‘त्या’ नराधम पित्याचा पोलिसांना सतत गुंगारा

मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण : गुप्तचर पोलिसांचे कुटुंबीयांवर लक्ष
Vasco Crime News
Vasco Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित पिता आठवडा होत आला तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी गुप्तचर पोलिस पथकाने त्याच्या कुटुंबीयांच्या हालचालीवर लक्ष ठेवले आहे. त्याचे कुटुंबच त्याला पोलिसांच्या अटकेपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. संशयित वारंवार मोबाईल सीमकार्ड बदलत असल्याने पोलिसांना त्याचा शेध घेण्यात यश आलेले नाही.

जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल होऊन आठवडा झाला आहे. मुलीच्या आईची तक्रार नोंदवून पित्याचा शोध सुरू आहे. तो व्यवसायाने रंगकाम करणारा असल्याने त्याने जुने गोवेतील काही लोकांचे रंग काढण्याचे काम घेतले होते.

Vasco Crime News
Curti Panchayat : फोंडा पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रवी नाईकांची यशस्वी चाल

मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरारी झाला आहे. कुटुंबीयांशी संपर्क साधत असल्याने त्या घरातील लोकांवर नजर ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी चिंबल, मेरशी व सांताक्रुझ या परिसरात शोध घेतला आहे, मात्र तो सापडत नाही.

पीडितेला घरातून बाहेर दिले जात नव्हते. या सर्व जाचाला ती कंटाळली होती. तिला शिकायचे असल्याने पित्याच्या कचाट्यातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करण्यात यावी, अशी विनंती तिने केली आहे.

Vasco Crime News
Ponda Municipal Council Elections 2023: प्रभाग 15 ची अवस्था ‘असुनी नाथ, मी अनाथ’; विद्यमान नगरसेविका हॅट्ट्रिक साधणार ?

तपासात पोलिसांकडून सावधगिरी

या लैंगिक अत्याचार प्रकरण संवेदनशील असल्याने तपासकाम सावधगिरीने करण्यात येत आहे. मुलीने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने तो पत्नी व मुलीविरोधात टोकाचे पाऊल उचलू शकतो. त्यामुळे सर्व ती काळजी घेण्यात येत आहे.

हे लैंगिक अत्याचार प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते व त्याची पूर्ण माहिती मुलीच्या आईला व तिच्या मोठ्या बहिणीलाही माहीत होते. तिची मदत करण्याऐवजी त्यांनी तिच्यावरच दडपण आणून याविरोधात आवाज न उठवण्याची तंबी दिली होती. त्यामुळे ती अनेक महिने शांत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com