Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीचा गुंता सुटणार? रविवारी तज्ज्ञांची पाहणी; सोमवारी संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

Porvorim Elevated Road Inspection: अपघातांमुळे चर्चेत असलेल्या पर्वरी उन्नत मार्गाची पाहणी रविवारी नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा) प्रतिनिधी करणार आहे.
Porvorim Elevated Road Inspection
Porvorim Elevated RoadDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: अपघातांमुळे चर्चेत असलेल्या पर्वरी उन्नत मार्गाची पाहणी रविवारी नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा) प्रतिनिधी करणार आहे. त्यानंतर सोमवारी बैठक घेऊन वाहतूक समस्येवर तोडगा काढला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता संदीप चोडणेकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने नागपूर येथील या संस्थेशी वाहतूक अनुकरण आणि पादचारी स्थलांतराच्या अभ्यासासाठी करार केला आहे. त्या करारानुसार त्या संस्थेतील वाहतूक तज्ज्ञ बोलावण्यात आला असून तो शनिवारी सायंकाळी राज्यात पोचेल. त्याने रविवारी पाहणी करून उपाययोजना सुचविल्यावर सोमवारी बैठक घेऊन योग्य ते निर्णय त्यावेळी घेण्यात येतील.

Porvorim Elevated Road Inspection
Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले, की या विषयावर लगेच बैठक घेणे शक्य नाही. त्यासाठी नागपूरहून तज्ज्ञ गोव्यात येण्याची गरज आहे. मी रविवारनंतर या विषयावर सविस्तरपणे बोलेन. उन्नत मार्गावरून वाहतूक सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भीषण अपघात झाला. दुचाकीला कारने धडक दिल्याने दोघांना जीव गमवावा लागला होता.

या दुर्घटनेनंतर उन्नत मार्गावरील वाहतुकीबाबत अनेक निर्बंध लागू करण्यात आले. दुचाकीस्वारांना उन्नत मार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिमापक कॅमेरे बसविण्यात आले. त्याचबरोबर उन्नत मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सेवा रस्त्यांवरून वाहने वळविण्यावरही निर्बंध आणले आहेत.

Porvorim Elevated Road Inspection
Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या या उपाययोजनांचा थेट परिणाम पर्वरीवासीयांच्या दैनंदिन वाहतुकीवर झाला आहे. पर्वरीहून अटल सेतूकडे जाण्यासाठी असलेली पूर्वीची थेट वाट बंद झाल्याने नागरिकांना पुन्हा जुन्या मार्गाचा वापर करून नव्या मांडवी पुलामार्गे पणजी गाठावी लागत आहे. त्यामुळे विशेषतः कार्यालयीन वेळेत वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री खंवटे आणि कामत यांच्यात झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत उन्नत मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजना कायम ठेवून पर्वरीवासीयांना अधिक सुलभ प्रवेश कसा देता येईल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुचाकींवरील बंदी, वेगनियंत्रणासाठी बसविलेले कॅमेरे, सेवा रस्त्यांवरील निर्बंध तसेच अटल सेतू आणि म्हापशाच्या दिशेने जाणारे बंद केलेले प्रवेशमार्ग यांचा एकत्रित आढावा घेण्यात येणार आहे.

खंवटे, कामतांमध्‍ये होणार संयुक्‍त बैठक

पर्वरी उन्नत मार्गावरील अपघात हा बेदरकार वाहनचालकामुळे झाला. त्यानंतर दुचाकी बंदीसह केलेल्या उपाययोजनांबाबत मला अंधारात ठेवल्याचे स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी म्हटल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा सुरू झाली.

२ मंत्री कामत आणि खंवटे यांची दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर आता पर्वरी येथील नव्या उन्नत मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा निर्माण झालेला गुंता सोडविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

३ या प्रश्नावर मंत्री खंवटे आणि कामत यांनी साबांखाच्या अभियंत्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आज नियोजन केले. त्यामुळे उन्नत मार्गावरील सध्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता पुढे काय होणार?

अपघातानंतर सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असले तरी त्याचवेळी उन्नत मार्गाचा वाहतूक सुलभ करण्याचा मूळ उद्देशही साध्य झाला पाहिजे. त्यामुळे आगामी बैठकीत सुरक्षा आणि नागरिकांच्या वाहतुकीच्या सोयीचा समतोल साधणारा तोडगा निघतो का, याकडे पर्वरीवासीयांचे लक्ष लागले आहे.

Porvorim Elevated Road Inspection
Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

उन्नत मार्गाचा हेतू असफल

म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचीही अडचण कायम आहे. साई सर्व्हिस चौकातून उजवीकडे वळल्यानंतर नव्या उन्नत मार्गावर जाण्यासाठी मॅजेस्टिक हॉटेलसमोरील प्रवेशमार्ग बंद करण्यात आला आहे. परिणामी वाहनचालकांना इच्छित दिशेने जाण्यासाठी जुन्या मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. उन्नत मार्ग उभारण्यामागील वाहतूक कोंडी कमी करण्याचा उद्देश असताना प्रवेशमार्ग आणि वळणांवरील निर्बंधांमुळे नागरिकांना पुन्हा जुन्याच मार्गावर पाठविले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road Two Wheeler Ban
Porvorim Elevated Road Accident
Porvorim Elevated Road Opens
Porvorim Elevated Road Inauguration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com