Porvorim Traffic: पर्वरीत NH 66 ला भगदाड; वाहतूक वळवली, जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Traffic Diversion Porvorim: दुरुस्तीच्या कालावधीत वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे
 traffic news Goa
traffic news GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Update

पर्वरी: एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या ड्रिलिंग दरम्यान पर्वरी येथील नेक्सा शोरूमजवळ राष्ट्रीय महामार्ग (एनएच) ६६ चा काही भाग खचला आहे. घटनेची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी तातडीनं परिस्थिती हाताळत दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

या दुर्घटनेमुळे पणजी-पर्वरी बाजूने म्हापसाकडे जाणारी वाहने ओ'कोकेइरो जंक्शनवर वळवण्यात आली आहे. त्यानंतर ही वाहने सीएचओजीएम मार्गे पुढे नेऊन वेलनेस फार्मसीसमोरील नव्याने बांधलेल्या रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पर्वरी बाजार उतारापर्यंत पोहोचतील.

 traffic news Goa
Goa Traffic Violations: वाहतूक विभागाचा दणका! 15627 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई; 347 मद्यपींच्या परवाना रद्दची मागणी

इतर रस्त्यांवरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू राहणार आहे,त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो या मार्गावरून प्रवास करण्याचे टाळावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं प्रशासनानं आवाहन केलं आहे. संबंधित प्रकल्पातील सुरक्षा उपायांची तपासणी करण्यात येत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com